|
पाटलपुष्प कुल अरुणपुष्प कुल, कॅरिओफायलेसी डायांथस (पिंक, अरुणपुष्प) सायलीन, स्टेलॅरिया इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव बेसींनी पाटलपुष्प गणात (कॅरिओफायलेलीझ) आणि हचिन्सन यांनी त्याच गणात पण फार संकुचित अर्थाने केला आहे. ऍल्सिनॉइडी व सायलिनॉइडी ही या कुलातील उपकुले आहेत. प्रमुख लक्षणे - खोडावरची पेरी फुगीर, साधी पाने समोरासमोर, कुंठित फुलोरा, सुट्या नखरी पाकळ्यांची व अवकिंज, पंचभागी, द्विलिंगी नियमित फुले, केसरदले पाकळ्यांच्या दुप्पट, २- जुळलेली किंजदले, एक कप्याच्या किंजपुटात मध्यवर्ती सुटा बीजकविन्यास आणि बोंड (फळ).
|