-
पु. ( सांडलेले दूध , रक्त , तेल इ० कांचे ) थारोळे ; तळे . [ हि . ताल = तळे ]
-
पु. १ ( संगीत . ) गीत , वाद्य व नृत्य ह्यांच्या क्रियेच्या गतीचे कालदर्शक नियमित प्रमाण ; ठेका . ( क्रि० धरणे ). प्रसिद्ध असे तीस ताल प्रचारांत आहेत . त्यांची नावे येणेप्रमाणेः - केहेरवा , दादरा , तीव्रा , रुपक , पस्तु , धुमाळी , मध्यमावती , गजल , ठेका , झपताल , सूलताल , रुद्रताल , भानुमती , चौताल , एकताल , खेमटा , फरोदस्त , अडाचौताल , झूमरा , दीपचंदी , धमार , सवारी , गजझंपा , तिलवाडा , त्रिताल , पंजाबी , टप्प्याचा ठेका , शिखर , विष्णुताल , मत्तताल व ब्रह्मताल . परोपरीचे गर्भे घालुनि नृत्यास रम्य बत्तिस या । करिती ताल धरुनियां ... - कमं ४ . १०८ . २ हातावर , दंडावर हात मारण्याची क्रिया ; टाळी वाजविण्याचीए क्रिया . ३ सम पहा . ४ ( नृत्य . ) हाताचा आंगठा व मधले बोट यांमधील जास्तीत जास्त अंतर . ५ कांशाचे एक वाद्यविशेष ( हे काठीने वाजवितात ); एक प्रकारचा टाळ . [ सं . ] सामाशब्द -
-
पु. ताडाचे झाड . [ सं . ]
-
पु. प्रयत्न ; खटपट . महाराजांपुढे तोंड वेंगाडून पैसे मिळण्याचा ताल करण्यापेक्षा , जर त्यांनी भिक्षांदेहि केली तर अधिक उत्तम . - विक्षिप्त ३ . १८२ .
Site Search
Input language: