Dictionaries | References e Equisetinae Script: Latin Meaning Related Words Equisetinae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 बंधकतृण वर्ग, हयवाल वर्गएक्किसिटीनीनेचाभ पादपापैकी (वाहिनीवंत अबीजी वनस्पतीपैकी) काही प्राचीन व काही विद्यमान वनस्पतींचा गट, यालाच आर्टिक्युलेटी असेही इंग्रजी नाव आहे. यात वनस्पतींची प्रमुख पिढी बीजुकधारी, मुळे, खोबणीदार हिरवे खोड व बहुधा फार लहान मंडलाकृती पानांचे झुबके, फांद्या असल्यास मंडलाकार, पाने वंध्य व जननक्षम, विशिश्ट प्रकारच्या उपांगांवर (बीजुक कोशधरांवर) बीजुककोश आधारलेले असून वाहक स्तंभात (रंभात) पर्णविवरे नसतात. विद्यमान वंश (एक्कीसीटम) एकच असून त्याचा अंतर्भाव बंधकतृण कुलात (एक्किसीटेसी) व बंधकतृण गणात (एक्किसीटेलीझ) केला असून त्याशिवाय हेनिएलिझ आणि स्फेनोफायलेलीझ हे प्राचीन गण बंधकतृण वर्गात समाविष्ट आहेत. एक्किसीटमच्या प्रजोत्पादक अवयवास शंकू म्हणतात व त्यामध्ये एका लहान अक्षावर छत्राकृती बीजुककोशधर असतात. त्या छत्राखाली बीजुककोश उभे टांगलेले असून त्यात सारखी दिसणारी बीजुके असतात. रुजल्यावर दोन स्वतंत्र (एकलिंगी) गंतुकधारी बनवतात.pteridophyta.Horsetails Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP