|
पुष्पीय, पुष्प- फुलांचा, फुलासंबंधी, फुलांतील f.axis पुष्पीय, पुष्प- f.bud पुष्पाक्ष फुलाचा किंवा फुलातील अवयवांचा दांडा (अक्ष) f.diagram पुष्पचित्र फुलातील सर्व भाग, त्यांचे परस्परांशई व खोडाशी संबंध दर्शविणारी छेदासारखी आकृती f.envelops परिदले फुलातील संदले, प्रदले अथवा तत्सम आवरक पुष्पदले f.formula पुष्पसूत्र फुलातील सर्व संरचना पूर्णपणे संक्षिप्त रीतीने व्यक्त करण्याकरिता आंतरराष्ट्रीय खुणा, चिन्हे व आकडे इत्यादींचा उपयोग करून ते सूत्रमय पद्धतीने मांडण्याचा प्रकार- उदा. कर्कटी कुलातील सर्वसाधारण पुष्पसूत्र- नरफूल - + o के(३-५)सी(३-५) ए३ स्त्रीफूल- + oके(३-५)सी(३-५)जी(१-३) चामरकुलाचे पुष्पसूत्र + के५-०सी ए जी २ ३) मोहरी कुलाचे पुष्पसूत्र + के२+२सी ए + ४जी (२) स्पष्टीकरण १) येथे नियमित नरफुलात संदले जुळलेली तसेच प्रदलेही जुळलेली ३- व केसरदले असतात, स्त्रीफुलात इतर भाग तसेच असून केसरदलांऐवजी१- जुळलेली अधःस्थ किंजदले २) येथे द्विलिंगी नियमित फुलात सुटी पाच संदले, कधी नसल्यासारखी, पुष्पमुकुटात सुट्या पाकळ्या व सुटी केसरदले आणि अधःस्थ जुळलेल्या किंजदलांचा किंजपुट असतो ३) येथेही नियमित द्विलिंगी फुले असून संवर्तात संदलांची मंडले, पाकळ्यांचा पुष्पमुकुट आणि केसरदलांची मंडले, एकात व दुसऱ्यात ४, ही सर्वच पुष्पदले सुटी मात्र किंजपुट ऊर्ध्वस्थ किंजदले जुळून बनलेला असतो. प्रदले व केसरदले यांचा संपर्क सी ए ह्याप्रमाणे वरच्या दोन्ही कमानी रेषेने (उदा. धोत्र्याचे फूल) आणि केसरदले व किंजदले यांची युती ए जी याप्रमाणे दर्शवितात (उदा. रुई) अनेक पुष्पदलांकरिता oo ही खूण (उदा. पेरु, सिताफळ) अनियमित पुले असल्यास .l. ही खूण (उदा. तुळस, वाटाणा) व नियमित फुलासाठी + ही खूण वापरतात (धोत्रा, गुलाब). सुटी पुष्पदले कंसात न घालता व जुळलेली (अंशतः व पूर्णतः) पुष्पदले कंसात घालून दाखवितात. किंजमंडल ऊर्ध्वस्थ असल्यास, जी पुढील आकड्याखाली आडवी रेषा लिहितात. देवनागरी ऐवजी रोमन लिपीतही (K,C,A,G) आद्याक्षरे वापरून पुष्पसूत्र लिहिता येईल. तसेच भारतीय देवनागरी आद्याक्षरे (सं.पु, के, किं.) वापरुन पुष्पसूत्र लिहिणे शक्य आहे. f.leaf पुष्पदल फूल हा प्रजोत्पादक प्ररोह मानल्याने त्यातील अक्षावरची सर्व प्रकारची दले, पानांची रुपांतरे होत. उदा. संदले, प्रदले, केसरदले व किंजदले, पुष्पाक्ष व पुष्पस्थली हे त्यातील खोडाचे (अक्षाचे) भाग पहा flower, shoot f.shoot पुष्पप्ररोह प्रजोत्पादनाकरिता फुलात रुपांतर पावलेला वनस्पतीचा भाग (प्ररोह). इतर शाकीय भागाप्रमाणे यातही अक्ष व पाने (पुष्पदले) अंतर्भूत होतात. f.symmetry पुष्पसमात्रता फुलातील भाग व त्यांचे परस्पर संबंध यावर त्यातील प्रमाणबद्धता अवलंबून असून एक, दोन अथवा अधिक उभ्या पातळ्यांनी फूल विभागून ती प्रमाणबद्धता व्यक्त करण्याची पद्धत पहा radial, bilateral, asymmetrical
|