|
चंपक कुल, मॅग्नोलिएसी सोनचाफा, कवठी चाफा, टुलिप वृक्ष इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे प्रारंभिक कुल. याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) करतात. हचिन्सन यांनी चंपक गण (मॅग्नोलिएलीझ) या स्वतंत्र गटात केला आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, क्षुपे व लता, तैलमार्गयुक्त, साधी सोपपर्ण पाने, द्विलिंगी किंवा एकलिंगी, अवकिंज, एकाकी, फुले टोकास किंवा पानांच्या बगलेत असतात, पुष्पदले सुटी, परिदले मंडलित किंवा सर्पिल, केसरदले व किंजदले अनेक व सर्पिल, मृदुफळ, सपक्षफळ किंवा पेटिकाफळ, बिया सपुष्क
|