-
पु. प्राण्याची शिंगें , नखें वगैरेच्या रांध्यापासून बनलेला एक चिकट पदार्थ . [ फा . सरेश ]
-
वि. १ श्रेष्ठ ; वरिष्ठ ; उत्कृष्ट ; उत्तम ; सुरेश ; चांगला . सरस बासन वजनदार पाहुणे मेले बहुत फार । - ऐपो १८५ . हौदे अंबार्या सरशा निरश्या । - ऐपो २४० . २ वरचढ ; वरच्या दर्जाचा ; अधिक मोठा ; जाडा ; आकार गुण , संख्या वगैरेनी अधिक [ सं . श्रेयस ] सरसता , सरसाई - स्त्री . १ श्रेष्ठपणा ; उत्कृष्टता . २ वरचढपणा ; आधिक्य .
-
वि. अधिक चांगला , वरचढ , वरच्या दर्जाचे ;
-
वि. उत्कृष्ठ , उत्तम , चांगला , वरिष्ठ , श्रेष्ठ , सुरेख .
Site Search
Input language: