-
१ ( संक्षेप ) श्रीमंत . २ श्रीयुक्त , श्रीयुत . ३ श्रीमती . यांचा संक्षेप .
-
पु. ( संगीत ) एक राग . यांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , तीव्र मध्यम , पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . आरोहांत गांधार व धैवत वर्ज्य . जाति औडुव संपूर्ण . वादी ऋषभ , संवादी पंचम , गानसमय सांयकाल .
-
स्त्री. १ लक्ष्मी . श्रियेचीं राउळें । - ज्ञा १६ . २०० . श्रियेसारखिया दासी । घरी जियेतें । - ज्ञा ९ . ३७३ . २ ऐश्वर्य ; संपत्ति ; कांति ; शोभा . श्रीची प्राप्ति झाली म्हणजे ग ची बाधा होते . - गुप्तमंजूष ४ . ३ जगांतील तीन पुरुषार्थ - धर्म , अर्थ , काम , समुच्चयानें . श्री हरील शकुनी ती - मोसभा ३ . ४३ . ४ देवतां , तीर्थे , धर्मग्रंथ , गुरु वगैरेच्या नांवापूर्वी आदरार्थ योजावयाचे उपपद ; ग्रंथ , पत्र वगैरेच्या आरंभी लिहावयाचा शुभदर्शक श्रीगणेशायनमः याचा संक्षेप . ५ ऐश्वर्य , वैभव , सौंदर्य वगैरेचा द्योतक म्हणून अनेक शब्दांपुढे हा शब्द जोडतात . उदा० गर्भश्री , गृहश्री , जयश्री , जलश्री , यशश्री , वनश्री , वीरश्री इ० ६ ( सांके . ) काशीक्षेत्र . आपण श्रीहून कधी आला . - पया १३ . ७ - पु . शंकाराचार्य यांस उद्देशून उपयोग . या उत्सवास करवीर पीठाचे श्रीहि उपस्थित होते - केसरी १७ . ५ . ३० . [ सं . ]
-
ना. ऐश्वर्य , दौलत , धन , पैसा , लक्ष्मी . संपत्ती , संपदा ;
Site Search
Input language: