-
पु. १ परशुराम , रामचंद्र , बलराम यांस सामान्य संज्ञा . २ ( ल . ) सामर्थ्य ; तथ्य ; जीव . त्या उपरण्यांत आतां कांहीं राम उरला नाहीं . ३ ( सांकेतिक ) सीता किंवा सीताबाई हें जसें अधेलीस त्याप्रमाणें राम हें रुपयास नांव आहे . ४ वाईट बातमी ऐकली असतां किंवा दुसर्यानें बोललेल्या दोषादिकांचा निषेध कर्तव्य असतां हा शब्द उच्चारतात . [ सं . रम् = रमणें ] ( वाप्र . )
-
०नसणें ( मारुतीला सीतेनें प्रसन्न होऊन दिलेल्या तिच्या गळयांतील रत्नहाराचें एक एक रत्न त्यानें फोडून पाहिलें पण त्यांत रामाची मूर्ती त्यास दिसेना म्हणून तें व्यर्थ समजून तो सर्व हार त्यानें फोडून टाकला ह्या कथेवरून ) सत्व , अर्थ नसणें .
-
०म्हणणें होणें - ( मरतांना माणसाच्या तोंडांत रामाचें नांव यावें अशी हिंदूची समजूत आहे ह्यावरून ) मरणें ; मरण्यास सिध्द होणें ; मरणोन्मुख होणें . रामाचें नांव रामचर्चा - एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभाव होता असें जोरानें सांगावयाचें असतां योजतात . अजून तरी त्याला पश्चात्ताप झाला होता म्हणाल , तर रामाचें नांव . सामाशब्द -
-
०कली कल्ली कलीभैरव कल्लीभैरव - स्त्री . ( राग ) ह्या रागांत षडूज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्णसंपूर्ण वादी पंचम . संवादी ऋषभ . गानसमय प्रात : काल . वरील स्वरांशिवाय तीव्र मध्यम व कोमल निषाद ह्या स्वरांचा विशिष्ट प्रयोग रागवाचक असाच दिसतो . प्रभात समयीं रामकली । - दावि १८६ . [ रामकेलि ]
Site Search
Input language: