-
खडशेर कुल, कॅजुरिनेसी
-
खडशेरणीचा अंतर्भाव करणारे द्विदलिकित लहान कुल, पूर्वी याचा अंतर्भाव ऍमेंटिफेरीमध्ये (नतकणिश गणात) करीत. कारण त्यातील वनस्पती प्रारंभिक मानल्या असाव्या. हल्ली या गणातील वनस्पती मुक्तप्रदल वनस्पतीपासून ऱ्हास पावल्या आसून प्रारंभिक नाहीत असे मानतात. प्रमुख लक्षणे - मरुवनस्पती, शाखा हिरव्या व खोबणीदार, पाने खवल्यासारखी, मंडलित, फुलोरे एकलिंगी, पुंपुष्पे कणिशावर, स्त्री पुष्पे गुच्छावर, पुं पुष्पे सच्छद व सच्छद्रक, एक किंवा दोन परिदले, एक केसरदल व द्विखंडी परागकोश, स्त्री पुष्पे सच्छद व सच्छदक, परिदलहीन, एक कप्याचा व द्विकिंजदलांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट, बीजके दोन व तटलग्न, फळ पक्षधारी, कपाली व एकबीजी, सर्व फुलोऱ्याचे एक शंकूसारखे संयुक्त शुष्क व कठीण, फळ, तलयुती, अनेक गर्भकोशिका, वायुपरागण ही वैशिष्ट्ये आढळतात व ती लक्षणे प्राचीनत्व दर्शवितात.
-
Casuarina equisetifolia Forst. (Beef wood tree) खडशेरणी
Site Search
Input language: