Dictionaries | References

अगस्ति ऋषीचा वायदा

   
Script: Devanagari

अगस्ति ऋषीचा वायदा     

प्राचीन काळीं हिमालयपर्वत व विंध्यपर्वत यांमध्यें उंचीबद्दल स्पर्धा लागून दोन्हीहि पर्वत उंच वाढूं लागले. तेव्हां लोकांच्या व्यवहारांत विशेषत: विंध्य पर्वताच्या वाढीमुळें फारच अडचण येऊं लागली. तेव्हां अगस्त्य ऋषीची हें संकट टाळण्याबद्दल प्रार्थना केली. तेव्हां अगस्त्य ॠषि हे विंध्य पर्वताकडे गेले. आपले गुरुजी येत आहेत असें पाहून विंध्य पर्वतानें त्यांस दंडवत घातलें. तेव्हां. तेव्हां अगस्त्य ऋषि दक्षिणेकडे निघून आले व येतांना त्यांनीं विंध्य पर्वतास असें सांगितलें कीं, मी पुन
या मार्गानें येईपर्यंत तूं अशाच स्थितींत राहावेंस. तेव्हां विंध्य पर्वत आडवा पडलेल्या स्थितींतच अद्याप राहिला व अगस्त्य ऋषीनीं दक्षिणेंतचे आश्रम करून वास्तव्य केलें वपुन
उत्तरेकडे गमनच केलें नाहीं. अशा रीतीनें विंध्य पर्वताशीं केलेला वायदा कधीम्च पुरा केला नाहीं. यावरून कधींच पुरा करावयाचा नाहीं असा वायदा. जो करार कधींच पुरा करावयाचा नाहीं असा करार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP