Dictionaries | References

अबदागीर

   
Script: Devanagari
See also:  अबदागिर

अबदागीर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An ornamented umbrella borne over Rajas &c. in their processions.

अबदागीर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  An ornamented umbrella borne over Râjâs, etc., in procession.

अबदागीर     

 स्त्री. 
राजे वगैरे थोर लोकांच्या डोक्यावर सूर्याचें ऊन निवारणार्थ मिरवणुकीच्या वेळीं धरावयाचें छत्र . हें राजासाठीं किंवा सरदारासाठींहि असे . हा एक मान असून तो सरकार ज्याला देईल त्यानेंच ही वापरावयाची ; दुसर्‍यानें वापरल्यास शिक्षा होई . यासाठीं लागणार्‍या गड्याचा पगार व दर तीन वर्षांनीं कापड दांडा वगैरेचा खर्च सरकार देई . ही सालीना ६० ते ७० रुपयांची तैनात असे . - थोमारोजभा २ . २७५ . तीस हजार अबदागिरी बरोबर चाले ढिगारा - ऐपो १११ . [ फा . आफ्ताब = सूर्य + गिरफ्तन = पकडणें ].
०गिर्‍या  पु. अबदागीर धरणारा सेवक . पगार दरमहा ५ रुपये . - समरो २ . ६० .
०बाळ्या  स्त्री. कानांत घालावयाच्या ३२ बाळ्यांपैकीं एक दागिना . नालबाळ्या अबदागिरबाळ्या तर्कधर । - अफला ५५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP