Dictionaries | References

अहेव

   
Script: Devanagari

अहेव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
For अहेव & अहेवनवमी see अविधवा & अविधवानवमी.

अहेव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An unwidowed woman.

अहेव     

ना.  अविधवा , अहिवा , सवाष्ण स्त्री , सुवासिनी , सौभाग्यवती .

अहेव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सवाष्ण

अहेव     

 स्त्री. अविधवा ; सौभाग्यवती - सुवासिनी स्त्री . भर्तारेंवीण अहेव । जाण पां तो सर्व विटंबू । - एभा १४ . २५७ . म्ह० अहेवचा मेला खेळायला गेला = नवरा असलेल्या बाईचा मुलगा मेला तर तो खेळायला गेल्यासारखाच असतो , कारण तिला दुसरा होण्याचा संभव असतो .
सौभाग्य ; भाग्य . ब्रह्मविद्येचें अहेवकांकण आज फुटलें । - भाए ८५ . परंतु हे मम सुखसार्थकता हेंच मदीय अहेव । - टिक ४० . [ सं . अविधवा ; प्रा . अविहवा ]
०तंतु  पु. ( काव्य ) मंगळसूत्र ; सौभाग्यसूत्र . कृष्णमणी अहेवतंतु । कंठी धरिला न तुटतु । - एरुस्व ७ . ३६ .
०दोरा  पु. 
मंगळसूत्र .
नेहमीं पाठीस लागलेली नोकरी , उद्योग - धंदा ; नेहमीं टिकणारा , कायमचा दर्जा , मान , पदवी .
०नवमी   अविधवानवमी पहा .
०पण  न. सभर्तृकत्व ; पति जीवंत असण्याची स्थिति ; सौभाग्य . वल्लभाचिया उजरिया । आपणया पति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसिया । अहेवपणें । - ज्ञा १६ . ३७७ . सौभाग्य नटोनि अहेवपण । ऐसी मिरवीत निघाली । - भवि ३ . २४७ . राखें मजला अहेवपणीं । प्राणेश्वरातें सोडी पितया । - गुच ७ . ३४ . अहेवपणें हळद कुंकुममण्डित मरावें हीच इच्छा सर्व स्त्रियांची . - भावबंधन ९३ .
०मणि  पु. मंगळसूत्र . कीं अजय झाले रणीं । अहेवमणी । - पला ४० . १०१ .
०मरण  न. सौभाग्यवतीं असतां , पति जिवंत असतां , सवाष्णपणीं आलेलें मरण . हें स्त्रिया फार प्रिय व मंगलकारक समजतात .
०सवाष्ण  स्त्री. सौभाग्यवती स्त्री . सुवासिनी .
०सुयेव वि.  पति जिवंत असतांना मरण येत असलेली ( स्त्री ). [ अहेव + असु + ई ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP