Dictionaries | References

आकारे रंगती चेष्टा

   
Script: Devanagari

आकारे रंगती चेष्टा     

मनुष्याच्या बाह्य रूपावरूनच साधारण त्याची किंमत, त्याचे सामर्थ्य व त्याच्या हातून घडणार्‍या कृतीचा अंदाज करता येतो. मूळ संस्कृत श्र्लोक-आकारैरिंगितैर्गत्याच चेष्टया भाषणेन च। नेत्रवक्त्रविकाराभ्यां ज्ञायतेऽन्तर्गतं मनः।। -सुर. १४७.२२६. या श्र्लोकाच्या पहिल्या शब्दांच्या अपभ्रंशाने वरील म्हण बनली आहे. ‘आकारेंचि परेंगित कळते बोलोनि कायहो कळते।’-मोवन १.१२. ‘आकारेणैव चतुरास्तकर्यन्ति परेंगितम्। गर्भस्थं केतकीपुष्पमामोदेनेव षट्पदाः।।’ -सुर १५८.२३३. २. भावी गोष्टीची चिन्हें अगोदर दिसतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP