Dictionaries | References

आगरांत गेला आणि पांगारा आणला

   
Script: Devanagari

आगरांत गेला आणि पांगारा आणला     

(आगर = कोकणातील घराभोंवतालची नारळ पोफळी वगैरेची बाग) ही म्हण मूळ ‘अंगार्‍याला गेला आणि पांगारा घेऊन आला’ या म्हणीचा अर्थ बरोबर न कळल्यामुळे तीवरून शब्दविपर्यासानें बनली असावी. या म्हणीचा अर्थ-बागेत गेला त्याला दुसरी कोणतीहि महत्त्वाची वस्तु आढळली नाही तर पांगारा हीच वस्तु त्यास आणावीशी वाटली. यावरून पुष्कळ सुंदर, उपयुक्त वस्तु मिळण्यासारख्या असतां एखादा मनुष्य एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरच संतुष्ट होतो
किंवा अनेक प्रकारची मोठी कार्ये करण्याची संधि आली असतां एखादी क्षुल्लक गोष्टच घडवून आणतो, त्यास उद्देशून ही म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP