|
वि. पहिला ; आरंभींचा ; अगोदरील ; उपक्रम , सुरवात करणारा ( वेळ , स्थळ संबंधीं ). मुख्य ; प्रमुख ; सर्वोत्कृष्ट . आदि ; प्रभृति . काशी यात्राद्य यात्रा याणें केल्या आहेत . - पु . आदिपुरुष ; परमेश्वर . ओं नमोजी आद्या । - ज्ञा १ . १ . [ सं . ] कवि , कारण , काल , काव्य , देव , धर्म , पुरुष - इ . या सामासिक शब्दांपेक्षां आदिकवि - आदिकारण इ० शब्द अधिक प्रशस्त . ते पहावे . ०गोदान न. मुख्य अनुष्ठान करण्यापूर्वी प्रायश्चितांगभूत करावयाचें गाईचें दान . [ सं . आद्य + गो + दान ] ०ग्रह पु. पहिल्याप्रथम एखाद्या विषयीं असणारी होणारी भावना , ग्रह , ठसा , पूर्वग्रह . ०जंतु पु. ( प्राणि . ) आदिजीव ; ( इं . ) प्रोटोझोआ . ०नाडी स्त्री. ( ज्यो . ) नाडी पहा . ०पीठ स्थान - न . पूर्वजांची भूमि किंवा स्थळ . देवता जेथें प्रथम अवतीर्ण किंवा उपलब्ध झालीं तें स्थान . प्राचीन व पूज्य असें क्षेत्र , नगर , स्थळ [ सं . ] वेद - पु . ऋग्वेद . ०वेदी वि. ऋग्वेदी शाखेचा . आद्यवेदी असे आपण । - गुच १७ . १७ . ०ज्ञान न. प्रथमचें , मूळ ज्ञान ... शहाणपण . उपजत , अंगचें अथवा जातीचें शहाणपण ; नैसर्गिक बुध्दि . मूळ कल्पना . नवीन शोध , शक्कल ; प्राथमिक युक्ति , प्रयुक्ति . [ सं . ]
|