Dictionaries | References

उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा

   
Script: Devanagari

उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा     

उडदापेक्षां कठिणपणांत व काळेपणांत अधिक असलेल्या अनेक वस्तु आहेत
पण तिकडे लक्ष न देतां तो स्वतःचीच मोठी प्रौढी मारतो. मनुष्याला स्वतःच्या गुणांची फार प्रौढी वाटते. व तो स्वतःच त्याबद्दल फुशारकी मारीत असतो व आपल्यापेक्षा इतर कोणी अधिक गुणवान असतील याची चौकशी वगैरे करण्याच्या भानगडीत तो पडत नाही
तर स्वतःचीच स्तुति करण्यात दंग असतो. वास्तविक काळेपणा व कठिणपणा हो दोष आहेत पण काही लोकांस आपल्या दोषांबद्दलहि अभिमान वाटतो. व त्यांचीच ते फुशारकी मारूं लागतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP