|
वि. ताठ ; वर ; खडा ; आडवा नसलेला ; न वांकलेला ; न बसलेला . उभा राहून किती वेळ बोलशील ? ये , इथें झोपाळ्यावर बैस . सरळ दिशेंत असलेला ; लांबीच्या अनुषंगानें सरळ रेषेंत असणारा ( रस्ता ). याच्या उलट आडवा ( रस्ता ). चालू ; सुरु असलेला ( धंदा वगैरे ). माझें घर बांधण्याचें काम उभें आहे . न कापलेलें ; शेतांत उभें असलेलें ( पीक वगैरे ). शेतांतील उभें पीक शत्रूनें कापून नेलें . . तयार ; उत्सुक ; पुढें आलेला ; सिद्ध . त्याचें घर विकत घेण्यास कोणी उभा रहात नाहीं . सतत ; अढळ ; जागृत ; पक्का ; तीव्र ( द्वेष , दावा वगैरे ). त्या दोघांमध्यें उभा दावा आहे . . संपूर्ण ; सर्व ; अथपासून इतिपर्यंत ( संवत्सर , साल , वर्ष वगैरे ). उभ्या वर्षांत धंद्यामध्यें कांहीं फायदा झाला नाहीं . . सारखा ; चालू असलेला ; खळ न पडणारा ; फार वेळ टिकणारा ; अविरत ( पाऊस , वारा वगैरे ). उभ्या पावसांत शेतलावणीचें काम चालू होतें . सरळ धारा पडत आहेत असा ( पाऊस ). ० थेट समोरुन येणारा ; तोंडावर येणारा ; विरुद्ध दिशेकडून येणारा ( वारा वगैरे ). वारा उभा असल्यामुळें गलबताची गति खुंटली , मंद झाली . गति नसलेला ; थांबलेला ; स्थिर . [ सं . ऊर्ध्व ; प्रा . उब्भ ; सिं . उभो ; बं . उबु ] ०करणें क्रि . थांबविणें ; गति बंद करणें ; स्तब्ध करणें ; गाडी उभी कर . . बंद करणें ; तात्पुरता थांबविणें ; कांहीं काळ थोपविणें ( धंदा , काम वगैरे ). मंदीमुळें सध्यां धंदा उभा केला आहे . रचणें ; उभारणें ; तयार करणें . पोलिसांनीं खोटा खटला उभा केला . ( बायकी ) धुतांना लांब वस्त्र एका पदरापासून दुसर्या पदरापर्यंत सारखें करुन घेणें . उत्पन्न करणें , आणणें . शिवाजीमहाराजांच्या नेत्रांतून देखील अश्रू उभे केले . - इंप १०६ . आडवी पडलेली वस्तु लंबरेषेंत ठेवणें . समई आडवी पडली आहे ती उभी कर पाहूं ! ०होणें थांबणें ; तात्पुरता बंद होणें ; विश्रांति घेणें . ०धरणें निर्बंधात ठेवणें ; कडक शिस्तींत वागविणें ; जांचणूक करणें ; त्रास देणें ( धनकोनें रिणकोस , मुलानें आईस वगैरे ). केव्हांपासून यानें मला अगदीं उभें धरिलें आहे , जरा घे तरी ! . ०जाळणें अत्यंत हाल करणें ; अतिशय त्रास देणें ; छळणें . ०ठाकणें उत्पन्न होणें ; समोर येणें . संगतीच्या लोकांचा भोग । उभा ठेला । - दा १२ . ९ . २४ . ०नाहणें सर्वांग भरुन येणें , पाझरणें , निथळणें ( घाम , रक्त वगैरेनीं ). ०राहणें मिळणें ; प्राप्त होणें ; संपादन करणें . व्यापारांत घातलेलें माझें भांडवल अद्यापि सारें उभें राहिलें नाहीं . . घडणें ; जवळ येणें ; निकट येणें ( एखादी गोष्ट किंवा कृत्य ); प्राप्त होणें ; आवश्यक होणें . साहाय्य करण्यास पुढें येणें , तयार होणें , सिद्ध होणें . बहुत जन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे ॥ - दा १९ . ४ . ११ . एखाद्या संकटांतून वर येणें ; नशीब काढणें . पोटांत गोळा उभा राहणें ; संकट येणें , उपस्थित होणें . आड येणें ; अडचण , प्रतिबंध होणें ; पुढें येणें . त्यावेळीं एक गोष्ट उभी राहिली , तेणेंकरुन माझा बेत जागच्याजागींच राहिला . माझ्या मुलीचें लग्न उभें राहिलें आहे , तुम्हाला द्यावयाला मजजवळ पैसे नाहींत . उत्पन्न होणें ; मिळणें ; प्राप्त होणें ( किंमत वगैरे ). या मालाचे रुपये पांच हजार उभे राहिले कीं , माझे वडील भाग्योदय मानतील . - विवि . १० . ५ . १९७ . अनुकूल होणें . उभे राहिलें भाग्य बिभीषणाचें । - राक १ . ७१ . ०इंद्र - पुन्हां सुरुवात करणें ; नव्यानें आरंभ करणें ( काम , धंदा वगैरेस ). करणें - पुन्हां सुरुवात करणें ; नव्यानें आरंभ करणें ( काम , धंदा वगैरेस ). ०छेद पु. ( गणित , स्थापत्य , चित्रकला ) एखादी वस्तु उभी ( ओळंब्यांत ) वरपासून खालपर्यंत कापली असतां दिसणारें दृश्य . ०तांब्या पु. राजापुराकडील उभंट आकाराचा पितळेचा किंवा तांब्याचा लोटा . ०दांडा पु. उभा , सरळ खांब . ( ल . ) सरळ व्यवहार ; सरळ वर्तन ; युक्तीचें , कुशलतेचें वर्तन . [ उभा + दंड ] ०दावा पु. हाडवैर ; अक्षय , कायमचें वैर . म्ह० जावा जावा , उभा दावा . ( उभे ) दोन प्रहर पु . उभीदुपार पहा . आपल्या झोपड्यांवर उभ्या दोन प्रहरीं चांगलें ऊन पडतें . - पाव्ह २७ . ०दोरा पु. धांवदोरा ; कच्ची शिवण ; टीप याच्या उलट . ०नासणें सर्व नाश होणें ; तात्काळ नासणें . जे शब्दीं वदोनि उभा । संसारनासी ॥ - दा १ . २ . ९ . ०पाहारा पु. खडा पाहारा ; अत्यंत काळजीपूर्वक , डोळ्यांत तेल घालून केलेली राखण . सारखें उभें रहाणें , बसावयास फुरसत न मिळणें ; एकसारखे कष्ट ; विश्रांतीचा अभाव . दिवसभर्याच्या उभ्या पाहार्यांत अंग भरुन येऊन रात्रीं मेलं केव्हां एकदां आडवी होईन असं होऊन गेलं . - नाट्यछटा ( फाटक ) २ . ( ल . ) एकसारखी केलेली चाकरी , सेवा ; एखाद्या आजार्याची एकसारखी केलेली सारखी शुश्रूषा . ०पाऊस पु. मोठा , सरळ धारांनीं पडणारा पाऊस ; न खळणारा पाऊस . ०बाजार पु. या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सर्व बाजार ; सगळी बाजारपेठ . तूं दिलेल्या रंगाची लोंकर उभ्या बाजारांत मिळत नाहीं . . भरबाजार ; बाजाराचा मध्य भाग ; चव्हाटा . उभ्या बाजारांत कथा । हें तों नावडे पंढरीनाथा ॥ ०मा्र्ग पु. राजरस्ता ; सार्वजनिक रस्ता ; रहदारीचा रस्ता ; मोठा रस्ता ; हमरस्ता . या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सर्व , सगळा रस्ता . सरळ रस्ता ; आडवा नसलेला , वांकडातिकडा नसलेला रस्ता . ( ल . ) सरळ , प्रामाणिकपणाचें वर्तन ; शहाजोग व्यवहार . उभ्यामार्गानें जाणें , येणें - न . सरळ मार्गानें , न थांबतां , वांकडेंतिकडें न जातां जाणें . ०माल पु. तयार झालेलें , पण न कापलेलें शेतांतील पीक . उभ्या मालाची पाहाणी स्त्री . शेतांतील पिकाचा अंदाज . म्ह० उभ्यानें यावें ओणव्यानें जावें = वेळ प्रसंग पाहून वर्तन करावें , नम्रतेनें वागावें .
|