Dictionaries | References

उभारा

   
Script: Devanagari
See also:  उभाळा

उभारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ubhārā or ḷā m A farrier's anvil.
. Ex. कुलालाचा भोवरा जैसा भवे गरगरां ॥ कर्मवेगाचा उ0 जोवरीं ॥

उभारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The rising and spreading (as of a fragrance &c.)

उभारा     

 पु. 
 पु. नालबंदाची ऐरण , ठोकळा . [ उभार ]
 पु. 
इच्छा ; प्रवृत्ति ; उमाळा . वनि व्याघ्र वृकादिक सारे हिंसेचा त्यजति उभारा । - देप ८८ . ४ .
उभारणी ; रचना ; विस्तार ; मांडणी . तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्व कर्मांचा उभारा । - ज्ञा १८ . ३०४ .
उसाचा रस कढवितांना त्यास येणारी उकळी , ऊत . ( क्रि० येणें ). रसास उभारा येतो म्हणजे ... रस उतूं जाऊं लागतो . - कृषि ४७२ . उभारा धरणें - पुढाकार घेणें ; उद्युक्त होणें . परित्राणाय साधूच्या उभारा , धरी निवटाया सर्व भूमिभारा । - कृष्णजन्म ( देवनाथ ) ३८ . [ उद + भृ - भर ]
स्थिति ; अस्तित्व ; शीत उष्ण पर्जन्यधारा । अंगीं न लागती अंबरा । तेवी साधूचा उभारा । द्वंद्वसंभारानिर्द्वंद्व । - एभा ११ . ९४७ .
शरीराची ठेवण , बांधा . अंगें सर्वांग सुकुमार । मनोहर उभारा । - एरुस्व १५ . ५० . [ उभा + कृ ]
पोकळ अवसान ; उठावणी ; आकार ; डौल . तुका म्हणे उभार्‍यानें । खरे कोण मानितसे । - तुगा ३१८६ .
फैलाव ; दरवळणें ; पसरणें ; प्रसार ; विस्तार . जैसा कस्तुरीचा निकरा । तेथें परिमळाचा उभारा । तैसा ज्ञानानें शिष्यवरा । जन्मलासि तूं ।
चालू स्थिति ; स्थिरता ; अस्तित्व . ऐश्वर्येंसीं ईश्वरा । जियेंचें आंग संसारा । आपलाही उभारा । आपणचि जो ॥ - अमृ १ . २९ . [ सं . उद + भृ , उभार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP