Dictionaries | References

एका आंब्यांतुलिं आयदानं, एक वत्ता दुहाक, एक वत्ता झळक्याक

   
Script: Devanagari

एका आंब्यांतुलिं आयदानं, एक वत्ता दुहाक, एक वत्ता झळक्याक     

कुंभाराच्या भांड्यांचा आवा, भट्टी पक्की होऊन भांडी वापरण्यायोग्य भाजून तयार झाल्यावर त्याचा उपयोग करणार्‍या इसमानाचे योग्यतेप्रमाणें होत असतो. त्या भांड्यांपैकी एक भांडे एखादा इसम दुधाला नेईल तर दुसरा मासळी किंवा मांस शिजविण्यास नेईल
म्हणजे एखाद्याने एखाद्या वस्तूचा दुरूपयोग केला म्हणून त्यामुळे त्याच वस्तूचा सदुपयोग करणारा दुसरा इसम आक्षेपार्ह होत नाही. कारण योजकस्तत्र दुर्लभः। प्रमाणें वस्तूचा उपयोग अथवा किंमत होते ती त्या वस्तूवर अवलंबून नसून उपयोग करणार्‍यावर अवलंबून असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP