|
वि. स्त्री. द्वंद्वयुद्ध ; पृथक युद्ध . समागमें दहापंधरा तोफा घेऊन आपली फौज सोडून एकांगीस यावें याजप्रमाणें बाहेर आले . - भाब १३४ . कोणाच्या डेर्यांत शिरोन मारामार केली , कोणाशीं एकांगी करुन पराभविलें . - मराआ ४ . [ एक + अंग ] एकाच बाजूस सुंदर रंग , वेलबुट्टी वगैरे असलेलें ( चीट , रेशीम , मखमल , कापड इ० ). एकालाच पुरेसा ( पलंग , चटई इ० ). एकच गुण , बुद्धि , व्यवहार , ज्ञान इ० असलेला ; एकदेशी . ( राजा . ) कृश ; सडपातळ ; बारीक . [ सं . एक + अंग ] ०खण पु. एक बाजू चांगली असणारा ; उलटसुलट बाजू असणारा चोळखण . ( उ० मुंग्यांचा खण ). ०घर न. एकाच बाजूस उताराचें छप्पर असलेलें घर ; एकघई , एकपाखी घर . ०झाड न. एका बाजूस वाढणारें , फुटणारें झाड . ०पान न. एकाच बाजूस चांगलें असणारें ( विशेषत : केळीचें किंवा विड्याचें ) पान ( दुसरी बाजू सुरकुतलेली किंवा इतर प्रकारें चांगली नसलेलें ). ०भांडण न. ज्यांत एकच पक्ष भांडत आहे असें भांडण ; भांडणांतील एका बाजूचीच कैफीयत .
|