|
स्त्री. सलग खोली ; अरुंद लांब खोली .' ओसरीला लागून एक दहा खणांची लांबच्या लांब ओढ होती . तिला आम्ही कणंगीची खोली म्हणत असुं . आभाळाची सावली ७३ . ( ओढणें ) स्त्री. १ खेंच ; आकर्षणः हिसका ( घटट करण्यासाठीं किंवा ओढण्यासाठीं ). ( क्रि०देणें ). ' इतर धर्माचे पाद्री लोक नीत मानलेल्या लोकांवर प्रेमाचें . जाळें पसरून ज्यांस आपल्यांत ओढीत . त्यांच्या ओढीला विरोध करणारा आजपर्यंत कोणी नव्हता .' - दयानंदसरस्वती २३९ . २ ताण , जोर , दाब ( लांबविण्यासाठीं ); आंवळ . ( क्रि० घालणें ; बसणें ; पडणें ). ' तूरटीच्या पाण्यानें माझ्या दांताला ओढ बसली आहे .' ३ ओढावयाचा दोर ; ओढण्याचे कोणतेहि साधन , समान . ४ ओढीत नेण्याचा किंवा वर काढण्याचा पदार्थ . ५ ओढण ; वजन ; ओढण्याची शक्ति . ' हा दगड सहा बैलांच्या ओढीचा आहे .' ६ ज्यावरुन ओझें ओढीत नेतात तो रस्ता ; रस्त्यावर त्या वजनानें उमटणारा चर , रेघ , घांसर , खरड . ७ अडचणीची परिस्थिति ; पैशाची चणचण ; सावकारांचा पगादा . निकड , चिमट .' या महिन्याला माझी खर्चाची फार ओढ झाली आहे . ' ८ अतिशय मेहनतीमुळें व थकव्यामुलें शरीराला येणारा ताठपणा . ९ नदी किंवा प्रवाह यांचा जोर , ताण . ' इंद्रायणीचे पाण्यास फार ओढ आहे .' १० सुरमाडाची पोय ; जेथें पावसांत किम्वा ओलींत एखादा बांधकामाचा भाग येत असेल तेथें याचा बांधावयाच्या दोरीसारखा उपयोग करितात तो . ११ कल ; प्रवृत्ति ; गति ; झोक ; दोरीसारखा उपयोग करितात तो . ११ कल ; प्रवृत्ति ; गति ; झोंक ; - कडे प्रत्यत्न . ' उदकाची ओड स्वभावतः खोल प्रदेशाकडे असते .' १२ आकर्षण ; मोह ; पाश ; आंगावर घेतलेले काम वगैरेचा जोर ( जग , धंदा , कुटुंब यांबाबत ); ओढणारी शक्ति ( माया , प्रेम , इच्छा , आशा इ० ) ; कळकळ ; स्नेह ; सहनुभूति . ' कां गे बाई रोड । तर गांवाची ओढ ' १३ मार्ग राहाणें ; जोराचा विरोध करणें ; निष्ठुरपणें प्रतिबिंब करणें ; वेगानें सुटणें प्रवाह , जोराचा ओघ .( क्रि० घेणें ). १४ जनावर लावून एका वेळीं ओढीत आणलेला एक किंवा अनेक लाकडांचा समुदाय . १५ वरील लाकडांचा बांधावयाची दोरी . १६ बैलरहाट किंवा तेल्याचा घाणा यांच्या जोखडास व बैलाच्या मागें जो बेसनेकड असतो त्यास बांधवयाची दोरी किंवा दांडी ; ओढाळा . १७ तहान ' मला पाण्याची ओढ लागली आहे .' ( उदन्या ( तृष्णा )- उडण्ण - ओढणी - ओढ . भाअ १८३४ .) १८ मनाची हौस . ' प्राणसखें राजसे रोज गडे तुझ्या मनाच्या ओढी । आम्ही तृप्त करूं या घडीं । ' - सला १४ . ( ओढणें ; तुल० दे ओड्डढ = अनुरक्त ; सं . अवकर्ष - अउअढ - ओढा ; अकृष्ट - आउड्ढ - ओढ ; किंवा सं , उपधा ) ०काढणें ( हिं .) संकटांत दिवस काढणें . एक ओढ किंवा एके ओढीनें - एका हिसक्यासरशी ; पहिल्याच प्रयत्नास , जोरास , दणक्यांत , ओढीं ओढ असणें - दुःखावर दुःख येणें ; संकटांवर संकट येणें . ओढींत ओढ ( वारणें , करुन घेणें इ० ) - एक संकट भोगीत असतां दुसरें वारणें किंवा दुसरें ओढवून घेणें . वोढ पहा .
|