|
वि. १ न पिकलेला ; हिरवा ; कोंवळा ( फळ , गळूं पान इं० ). २ साफसूप न केलेला ; ओबडधोबड ( दगड , चित्र , इ० ) ३अशिजा ( भात , भाकरी , रसायन इ० ). ४ अपुरा व पक्का न केलेला ; सरासरीचा ; ठोकळ ( जमाखर्च , काम इ० ) . ५ अपुर्ण ; अपक्क ; अप्रौढ ( कट , मसलत इ० ) ६ अपुरें समजलेलें किंवा मिळविलेलें ( शास्त्र , कला ). ७ अपुर्या ज्ञानाचा ; अर्धवट शिक्षणाचा ( माणुस ). ' तो अभ्यासांत कच्चा आहे .' ८ बिन वाकबगार ; अडाणी ; संस्कारहीन ; यथातथा ज्ञान असलेला . ९ कोता अप्रौढ ; संकुचित ( विचार , बुद्धि ). १० गौण ; लहान ; कमी ( वजन , माप इ० ) ११ न टिकणारा ; लवकर नाहींसा होणारा ( रंग इ० ) १२ सविस्तर ; सर्व पोटभेद ज्या मध्यें घेतलें आहेत असा ( हिशेब ). १३ बळकट नाहीं असा ( बांधकाम इ० ) ' मातींत घर बांधूंनये , मातीचें काम अगदीं कच्चें असतें . ' १४ इयत्तेहुन वाजवीपेक्षां कमी , ' आम्हीं एका तासांत एक कच्चा कोस चालतों . ' १५ कढवून फार घट्ट न केलेला ( साखरेचा पाक . इ० ). १६ ( गणित ) त्रेराशिकांतील दुसरें व तिसरें या दोन पदांचा गुणाकार करून येणार्या रकमेस कच्चे म्हणतात . नंतर त्यांस प्रथमपदानें भागून आलेल्या भागाकारास पक्के किंवा पक्का म्हणतात ( ज्याच्यामध्ये भारी परिमाणाच्या किंमतीवरुन हलक्या परिमानाची किंमत काढावयाची असते अशा हिशेबांत उपयोग ), उ० १० शेरांस पांच रुपये , तर १॥ पावेशरास कितो . येथे ५ व १॥ ह्रांचा गुणाकार जो ७॥ ते कच्चे . १७ कामामध्यें तोटानफा हील तो मूळ धन्याचा अशा बोलीनें केलेली ( नोकरी , मामलत , इ० ); पगारी ( भक्ता न देतां नोकराकडून प्रत्यक्षपणें सारा वगैरे वसूल करण्याच्या पद्धतीला हा शब्द लावितात ). कच्चा हा शब्द अपुरा , ओबडधोबड , अप्रौढ , उणा ह्मा अर्थानें शब्दश ; व लक्षणिकरीत्या अनेक प्रकारें योजतात . उ ०कच्चा - लिहिणें - वर्तमान - बातमी - हकिगत - कैफियत - वरवरचें , पक्कें नव्हे तें , कसें तरी तयार केलेले ; अंदाजी . कच्चा ताळा - ताळेबंद - कीर्द - जमाबंदी - बाब - हिशेब - बेरीज ' इ० , = अपुरा ; बंद न केलेला , अपूर्ण . ( ध्व . कच ; हिं . कच्चा ; तु० सं . कथ्थ = खोटें ) मजकूर - लिहिणें - वर्तमान - बातमी - हकिगत - कैफियत - वरवरचें , पक्कें नव्हे तें , कसें तरी तयार केलेले ; अंदाजी . कच्चा ताळा - ताळेबंद - कीर्द - जमाबंदी - बाब - हिशेब - बेरीज ' इ० , = अपुरा ; बंद न केलेला , अपूर्ण . ( ध्व . कच ; हिं . कच्चा ; तु० सं . कथ्थ = खोटें ) ०अमदानी स्त्री. एकंदर जमा ( खर्च वजा न करितां ). ०अंमल पु. १ पगार घेऊन केलेली सरकारी ( जिल्हाची , तालुक्याची ) नोकरी , काम ; याच्या उलट मक्त्याचा अंमल . कच्चा मोकद्दमा पहा . २ कच्चा अर्थ १७ पहा . ०असामी पु. हंगामी , उपरी शेतकरी - मालक ; ज्याचा कबजा कायमचा नाहीं असा इसम . ०आकार पु. ठोकळ हिशेब , अंदाज ; साधारण आढावा . ०कागद पु. खळ न लावलेला कागद . ०करवड पु. माशाचा एक अप्रकार , याचा रस्सा करतात . - गृशि २ . ४७ . ०खर्च पु. १ कच्चा खर्चाचे तमाशे असतील त्यांच्या नाइकानें वेळीं आपले लोकांस १० दिवस रजा द्यावी .' - ( बडोदें ,) कलावंत खातें २० . ३ जुजबी ; ठोकळ खर्चाखेरीज खर्च ; जो प्रसंगी होईल तो सामान्य खर्च . ०खर्डा पु. १ अंदाजपत्रक ; बजेट ( हिशेबाचें ); पक्का करण्यापूर्वीचा पहिला खर्डा . २ कुळकण्यानें शेतकर्याकडून आलेल्या रक्कमांचा ठेवलेला हिशेब . ०खाना पु. पोळ्या , डाळभात , खिचडी इ० जिन्नस .- मसाप १ . १० . ०डांक डाग - पु . शिसें जस्त किंवा कथिल यांनीं दिलेला डांक ( चांदीचा नव्हे ); तात्पुरता जोड ; कस्तर करणें . ०ताप ज्वर - पु . साधा ताप ; विकोपाला न गेलेला ताप . ०तोळा पु. ( क .) ९२ गुंजांचा तोळा ( पक्का तोळा ९६ गुंजाचा असतो ). ०दोराधागा पु. पटकन तुटणारा दोरा ; पीळ न घातलेला दोरा . ०पक्का वि. अंदाजी , ठोकळ आणि त्यावरून केलेला पक्का हे दोन्ही ज्यांत आहेत असा ( जमाखर्च , वही खतावनी इ० ). ०पाडाढा पु. ठोकळ , तोंडीं , त्रोटक , ठाकठीक न केलेली , कच्ची हकिगत , वर्तमान , साधन ( क्रि०वाचणें ). ०बटवडा पु. इसमवार पगारवाटणी ( सरकारी नोकरी किंवा मजूर यांना ); डोईपगार . ०भरणा पु. रयतेनें भरलेला सारा , वसूल ( ऐन किंवा नक्त ) ०मामला मामलत - पु . कच्चा अंमल पहा . ०माल पु. ओबडधोबड ; न कमावलेली ; मुळच्या स्वरूपातील ; ज्याचा जिन्नस बनविला नाहीं अशी वस्तु ( कापूस , कातडें , बी , वनस्पती इ० ) ' विलायती कारखान्यांत हिंदुस्थानांतून जो कच्चा माल जातो तो बंद झाला . ' - के ३१ . ५ . ३० . ०मोकद्दमा पु. कामामध्यें नफातोटा होईल तो धन्याच्या वाट्याला अशा बोलीनें केलेलें काम , गुमास्तेगिरी ; कच्चा अंमल . मक्त्याच्या उलट . ०रंग पु. १ धुतला असतां जाणारा , न टिकाऊ रंग ; रंग पक्का करण्यासाठीं उकळावा लागतो , तो उकळला नसला म्हणजे त्यास कच्चा रंग म्हणतात . २ तिफाशी सोंगट्यांत काळा अथवा हिरवा रंग . ०वसुल पु रयतेकडुण आलेला सारा , खंड ( ज्याची वर्गवारी काढली नाहीं असा ). ०शेर पु. प्रमाणभूत ( पक्क्या ) शेरापेक्षां कमी असणारा शेर . ( क .) १५ रुपये भारांचा शेर . ( उलट पक्का ८० भारांचा ). कच्ची - स्त्री . ( तिफाशी सोंगट्यांत ) १ मेलेली पण पुन्हां नुकतीच जिंवत केलेली , नुकतीच बसविलेली सोंगटी ; पट फिरुन न आलेली सोंगटी . २ हिरवी किंवा काळी सोंगटी . तिफाशी सोंगट्यांत तांबडा व पिंवळा यांस पक्का व हिरवा व काळा यांस कच्चा रंग अशा संज्ञा आहेत . ३ ( ल .) फजिती ; मानहानि ; अपकीर्ति . ०असामी स्त्री. दिवाळें वाजलेला किंवा अपुरीं साधनें असलेला , नालायक सावकार , कंत्राटदार , कूळ , अर्जदार , खंडकरी इ ००कामाविशी कमावीस - स्त्री . तैनात घेऊन केलेलें सारावसुलीचें काम ; नफातोटा धन्याचा अशा बोलीनें मामलत वगैरे करावयाचा प्रकार ; कच्चा अंमल ( ह्माचा उलट मक्त्याची कामाविशी ). ०कुंदी स्त्री. कपडा भट्टींत न घालतां नुसता धुवून केलेली थंडी इस्त्री . २ धुतलेल्या कापड्यास खळ न लावतां केलेली इस्त्री . ( कच्ची + कुंदी = खळ लावणें , इस्त्री करणें ) ०कैद स्त्री. चौकशीपूर्वीची किंवा अपराध शाबीत होण्यापुर्वीची कैद . २ नजरकैद ; साधी कैद . ०कोंबी ( क .) एखाद्याचें भजन करणें . करणें ( क .) एखाद्याचें भजन करणें . ०खोर पु. सदोदित ज्याची फजिती किंवा पच्ची होते असा माणुस ; फजीतखोर . ०जमाबंदी स्त्री. एकूण आलेली गांवची जमा ( खर्च वेगळा काढून तो वजा न घालतां ). ०जप्ती स्त्री. ( कायदा ) दाव्याचा निकाल लागण्यापूर्वी केलेली जप्ती ; अवलजप्ती पहा . ०बाजू स्त्री. ( सोंगट्यांचा खेळ ) तिफाशी डावांत काळ्या व हिरव्या ०बाजु - स्त्री ( सोंगट्यांचा खेळ ) तिफाशी डावांत काळ्या व हिरव्या सोंगट्या . ०बुटी ट्टी - स्त्री . सोनेरी किंवा रुपेरी रंगानें कापडावर काढितात ती बुट , फुलें खडी .- वि . अशा कापडाचें ( पागोटें ; अंगा - रखा इ० ); खडीदार . ०माती स्त्री. कोरडी , चिक्कणपणा नसणारी माती , ०मामलत कच्चा अंमल पहा . ०मिती स्त्री. मारवाडी . सावकार हे कर्जाऊ दिलेल्या रकमेची तारीख आदल्या दिवशींची घालतात ती . याच्या उलट पक्की भिती ( कुळाकडुन आलेल्या रकमेची तारीख मात्र दुसर्या दिवशींची घालतात .) ०मुदत स्त्री. ( सावकारी ) हुंडी हातांत पडल्यानंतर अमुक दिवसांतच ती वटविली पाहिजे अशा प्रकारची दिलेली मुदत ; ह्याच्या उलट बंदीमुदत (= हुंडींत दिलेल्या तारखेनंतरची जास्त मुदत ). २ हुंडीची ठराविक मुदत भरण्यापूर्वीचा काल ; अद्याप संपावयाचा मुदतीचा काल . ०लढाई स्त्री. पुरा निकाल न होतां झालेलें युद्ध ; दोन्ही पक्षांनीं मध्येंच सोडुन दिलेली लढाई ; अनिणींत लढाई . ०वहिवाट स्त्री. कची वहिवाट पहा . ०शाई स्त्री. लाख न मिसळलेली , पाण्यानें निघून जाण्यासारखी शाई . ०सुपारी स्त्री न शिजविलेली सुपारी ; पोफळ ; रोठा . ०हुंडी स्त्री. अद्याप न पटलेली किंवा न स्वीकारलेली हुंडी . कच्चें - वि . न पिकलेलें , व इतर अर्थी कच्चा पहा . ०अंडें न नवीन घातलेलें अंडें ; ताजें अंडें . ०अक्षर न. खराब व बिन कित्याचें अक्षर ; वळण नसलेलें अक्षर . ०इरसाल न. जिल्हांतून सरकारी खजिन्यांत पाठविलेला शेतसार्याचा भरणा . ०कातडें न. न कमावलेलें किंवा रंगविलेलें कातडें . - खोर - कच्ची - खोर पहा . ०खातें न. ( हिशेब ) ज्या खात्याचें येणें - देणें पुढील सालास उतरावें लागत नाहीं असें खातें ; तात्पुरतेम खातें . ०गिरी स्त्री. कच्चेपणा ; अपुर्णता ; अपक्कता . ' तुम्ही आधीं कच्चेगिरी केली म्हणुन फसला .' ०चीट छीट - न . जें धुतलें असतां त्यावरील रंग नाहीसा होतो असें चीट . ०दूध १ न तापविलेलें , निरसें दूध . २ नवीन व्यालेल्या जनावराचें पहिल्या बारा दिवसांतील दूध ; कोवळें दूध ; ०नाणें न. चलनी नाण्यांत आलेला सरकारी वसूल ( यांत निरनिराळीं नाणीं सरभेसळ आलीं असतात .) ०पान न पान - वेलींचें , विड्यांचे हिरवें पान ( याच्या उलट पक्कें , पिकलेलें पान ). ०पोते न सरकारी चावडींत भरलेला शेतसारा ; सरकारी खजिन्यांत ज्या स्थितीत येतो त्या स्थितींतील वसुली पैसा . ०बच्चे न. ( अव . कच्चीबच्चीं ) मुलबाळ ; पोरबाळ ; लहान मूल ' येक म्हणे गा पळोन जावें । तरी कच्चे बच्चे काय करावें । ' - दावि २३२ . ' तो चार कच्याबच्च्यांचा धनी आहे .' ( हिं . कचबच ) ०बारा पु. ( तिफाशी सोंगट्यांत ) फांशांवरील एक दान ; ( एकावर पांच , एकावर सहा व एकावर एक अशा ) बारा ठिपक्यांचें दान . ०मडकें १ न भाजलेलें मडकें . २ ( ल .) अज्ञानी माणुस ( मडकें = डोकें , बुद्धि .) हें अजून कच्चें मडकें आहे . ' - नाम४ . ०रंग पु. ( तिफाशी सोंगट्यांत ) हिरवा व काळा रंग . कच्ची बाजू पहा . ०रेशीम न. पाण्यांत न उकळलेलें रेशीम . ०लोणी न. कोर्या दुधापासुन घुसळुन काढलेलें लोणी ( दह्यांचें नव्हे ). ०वजन न ( क .) ( सोन्याचें ) ९२ गुंजांचा तोळा . कच्चा तोळा पहा .
|