Dictionaries | References

कठिण

   
Script: Devanagari
See also:  कठीण , कठीन

कठिण     

वि.  १ अवघड ; अशक्यप्राय ; दुष्कर . २ संकटपूर्ण ; आपदग्रस्त ; कष्टपद ( गोष्ट , बनाव , प्रसंग ). ' कठिण समय येतां कोण कामासि येतो .' - र १० . ३ घट्ट ; बळकट ; टणक ; नरम नव्हे असें ; जें ; तोडण्यास बळ लागतें असें . ' लोंखड कठीण असतें .' ४ करण्यास वाईट . ' ही गोष्ट ( चोरी ) कठीण आहे !' ५ दुःखप्रद ; सोसण्यास अवघड ; जिवावरचें मरणप्राय ( आजार , रोग , स्थिति ). ६ कुर ; कठोर ; दयाशुन्य ( माणुस कृत्य ). ७ मनास लागेल असें ; कडक ; कठोर ( शब्द , भाषण ). ' आपलें झांकी अवगुण । पुढिलास बोले कठिण । ' - दा ५ . ३ . ९२ . ' वचन जयाचें कठीण । तो येक पढतमुर्ख ॥ ' - दा . २ . १० . ११ . ८ समजण्यास अवघड ( ग्रंथ , अभ्यास , व्यवहार ). ( सं . कठिन ; गु . सिं . कठण ; पं ; कट्न - न )
०वाटणें   अवघड वाटणें ; दुःख होणें . - नोत्तर - न . ( काव्य ) दुर्भाषण ; शिवीगाळ ; निर्भर्त्सना . ' म्हणोनि भांडे दिवस रात्र । कठोनित्तर बोलत । ' ( कठिण + उत्तर )
०मर्जी  स्त्री. गैरमर्जी ; इतराजी .
०वर्ण  पु. ट वर्ग आणि जोडाक्षरे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP