|
न. १ डोक्याची कवटी ; डोक्यांचं हाड ; करटी . २ मडक्याचा अर्धा भाग ; खापर ; खापराचा तुकडा ; श्रौतकमींत ज्यावर पुरोडाश भाजतात असे खापराचें तुकडे . ८ , ११ , १२ , १३ असून त्यांचा एक गट असतो . ३ भिवया आणि डोक्याचे केंस यामधील भाग ; ललाट ; भाल . ४ नशीब ; प्रारब्ध ; ब्रह्मलिखित ( ब्रह्मदेव मनुष्याच्या कपाळावर त्याचें भाविष्य लिहून ठेवितो या समजुतीवरून ). ' किं एकदांचि फुटलें त्वत्पतिपंचककपाळ पापानें .' - मोसभा ६ . ४ . ' गडे , काय कपाळाला करूं । नाहीं घरांत एक लेंकरूं ॥ ' - प्रला . ५ ( कपाल ) चपटें , पातळ हाड ; खांद्याचा किंवा मांडीचा फरा . ६ भिक्षापात्र , ' कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर । ' - तुगा २०५० . ७ ( भुगोलशास्त्र ) कोणत्याहि याम्योत्तर वृत्ताच्यापुर्वेकडील किंवा पश्चिमेकडील अर्धे गोलार्ध . - उद्गा . १ नाहीं . खोटें . अशक्य हा अर्थ पटविण्यासाठीं ' माझें कपाळ ! तुझें कपाळ । ' इ० उद्गार काढतात . ' असें ऐकतां हासले द्वारपाळ । वदों लागले कृष्णजीचें कपाळ ! । ' - कचसु ६ . २ दुःखदर्शक उद्गार , हाय ! हाय ! ' काय सांगु कपाळ !' ०उठणें चढणें - डोकें दुखणें ; त्रास कटकट होणें ; पीडा होणें . ' भजन करितो सर्व काळ । उठते कपाळ आमचें ॥ ' उगा करिती कोल्हाळ । माझें उथणें कपाळ । ' - रामदास . ०काढणें वैभवास चढणें ; नशीब काढणें , ' तो चांगला कपाळ काढील असा मला रंग दिसत आहे .' ०खुलणें ( हिं ) दैव उदयास येणें . ०जाणें दुर्देवाच्या फेर्यांत सांपडणें ; भाग्य नाहींसे होणें . ०टेकणें एखाद्यावर भरंवसा ठेवून अवलंबून असणें ; कपाळटेंक करणें . ०ठरणें नशिबांत लिहिल्यासारखी एखादी गोष्ट घडून येणें ; दैवांत असणें . ' पुढें मागें याही गोष्टीत सुधारकांचा वरचष्मा होऊन या हताश , विचार शुन्य , मत्सरी ... लोकांस ... मुळुगुळु रडत बसावे लागेल हें यांचे कपाळ ठरलेलेंच .' - आगर . ०धुवून नशिबीं काय आहे तें पाहणें ; नशीब पाहणें ; पाहणें नशिबीं काय आहे तें पाहणें ; नशीब पाहणें ; ०पिटणें दुःखातिशयामुळें डोकें जमिनीवर आपटणें . ' एक अवनीं कृपाळ आपटिती । ' - ह १८ . ९६ . ०फुटणें न. दुदैव ओढवणें ; दैव प्रतिकुल होणें ; सर्वस्वाचा नाश होणें ; आपर्त्ति कोसळणें .' कपाळी कुंकूं लागतें आहे म्हणुन हसायला लागूं कीं कपाळ फुटलें म्हणुन रडत बसूं ' २ वैधव्य येणें . ' मी गरीब कितिही असलें । जरी कपाळ माझें फुटलें । ' -( राजहंस ) गोविंदाग्रज ०फोडणें फार शोक , दुःख करणें . ' कुंतल तोडी , कपाळ फोडी , करी थोर आकांत । ' - विक ५३ . ०बडविण दुःखतिशयामुळें किंवा क्रोधाच्या आवेगानें कपाळ पिटणें ; कपाळावर हातानें मारुन घेणें . ' कळतां वृत्त क्रोधें घे बहु बडवूनि तो कपाळाला .' - मोवन ४ . ८३ . ०मोक्ष १ एखाद्याचा सर्वस्वी नाश करणें . २ खूप झोडपणें ; ठार मारणें . कपाळमोक्ष पहा . - ळाची रेघ - रेषा उमटणें , उघडणें - आकस्मिक रीतीनें सुदैव प्राप्त होणें ; एकदम मोठेपणा , श्रीमंती मिलणें = ळाचें कातड नेणें - विपत्तींत लोटणें ; भाग्यहीन करणें ; नुकसान करणें . - ळ्यांत तिडाक उठणें - १ डोंकें दुखणें . २ ( ल .) त्रासणें ; रागावणें ; ' आडमुठ्यांच्या घरांचें नांव काढलें कीं यशवंतरावांच्या कपाळास तिडीख उठे .' - यशवंतराव खरे . - ळांतले तीन फातर -( गो .) दुदैवाचे फेरे . ( ढोमले , थोड्यारें - थोड्यारे म्हणुन एक प्रकारची मासंळी आहे तिच्या डोक्यांत तीन पांढरे दगड असतात यावरुन .) - ळाला आठ्या घालणें , चढणें - त्रासणें ; अति त्रास होणें ; मनाविरुद्ध गोष्ट घडणें ( त्रास झाला असतां कपाळास आठ्या पडतात यावरून ). ' उलट कपाळाला आठ्या घालुन म्हटलें - तुला काय त्याची चौकशी ?' - उषःकाल . - ळ्याला किंवा कपालावर केस उगवणें - अशक्य गोष्ट घडणें . ( पुढें घडेल असें वाटणार्य़ा एखाद्या गोष्टीची असंभाव्यता दर्शवितांना हा प्रयोग योजितात . तळ हाताला केंस येणें याप्रमाणें ). - ळावर कपाळाला किंवा कपाळी हात मारणें , लावणें - न . नशीबास दोष देणें . २ आश्चर्य , दुःख , काळजी प्रदर्शित करणें . ' अशीच तुम्हीं दोघंही सदोदित कपाळाला हात लावून रडत बसत असतां .' - हामुबा ८२ . - ळाशी कपाळ घासणें - १ आपल्याला लाभ होईल या आशेनें एखाद्या भाग्यवानाशीं सहवास करणें ; संगतींत राहणें . २ कच्छपीं लागणें ; मागें मागें असणें ; गुलामवृत्तीनें अनुकरण करणें . - ळास अपकीर्तिअपयश - दारिद्र्य - आपत्ति येणें - अपमान , गरिबी , दुर्लोकिक इत्यादि प्राप्त होणें ; नांव बद्दु होणें . - ळ्यास , कपाळीं येणें - नशीबी येणें . ' जरी आलें पतन या कपाळाला । ' मोआदि १० . ८२ . -: ळीं कांटीं घेऊन जाणें - निघुन जाणें ; चालतें होणें ; काळें करणें . - ळीं डाग लागणें - बेअब्रु होणें ; फजिती होणें ; कलंक लागणें . - ळीं डाग लागणें - बेअब्रु होणें ; फजिती होणें ; कलंक लागणें . - ळीं भद्रा असणें - नेहमीं दुदैवी असणें ; प्रतिकुल प्रह असल्यामुळें दरिद्र्य येणें . - ळीं लिहिलेलें असणें - नशीबी असणें ; प्राक्तनांत असणें ; योग येणें . ' माझ्या कपाळी आपली सेवा एवढीच लिहिली होती .' - एक १२२ . - म्ह० १ कपाळभर कुंकूं व हातभर बांगड्या - सुवासिनीपणाची स्थित ; सौभाग्य . २ ( ल .) केवळ कुंकवाचा धनि म्हणुनच जीस्त्री नवर्याला मानते अशा स्त्रीच्या बाबतींत योजतात . करणें १ एखाद्याचा सर्वस्वी नाश करणें . २ खूप झोडपणें ; ठार मारणें . कपाळमोक्ष पहा . - ळाची रेघ - रेषा उमटणें , उघडणें - आकस्मिक रीतीनें सुदैव प्राप्त होणें ; एकदम मोठेपणा , श्रीमंती मिलणें = ळाचें कातड नेणें - विपत्तींत लोटणें ; भाग्यहीन करणें ; नुकसान करणें . - ळ्यांत तिडाक उठणें - १ डोंकें दुखणें . २ ( ल .) त्रासणें ; रागावणें ; ' आडमुठ्यांच्या घरांचें नांव काढलें कीं यशवंतरावांच्या कपाळास तिडीख उठे .' - यशवंतराव खरे . - ळांतले तीन फातर -( गो .) दुदैवाचे फेरे . ( ढोमले , थोड्यारें - थोड्यारे म्हणुन एक प्रकारची मासंळी आहे तिच्या डोक्यांत तीन पांढरे दगड असतात यावरुन .) - ळाला आठ्या घालणें , चढणें - त्रासणें ; अति त्रास होणें ; मनाविरुद्ध गोष्ट घडणें ( त्रास झाला असतां कपाळास आठ्या पडतात यावरून ). ' उलट कपाळाला आठ्या घालुन म्हटलें - तुला काय त्याची चौकशी ?' - उषःकाल . - ळ्याला किंवा कपालावर केस उगवणें - अशक्य गोष्ट घडणें . ( पुढें घडेल असें वाटणार्य़ा एखाद्या गोष्टीची असंभाव्यता दर्शवितांना हा प्रयोग योजितात . तळ हाताला केंस येणें याप्रमाणें ). - ळावर कपाळाला किंवा कपाळी हात मारणें , लावणें - न . नशीबास दोष देणें . २ आश्चर्य , दुःख , काळजी प्रदर्शित करणें . ' अशीच तुम्हीं दोघंही सदोदित कपाळाला हात लावून रडत बसत असतां .' - हामुबा ८२ . - ळाशी कपाळ घासणें - १ आपल्याला लाभ होईल या आशेनें एखाद्या भाग्यवानाशीं सहवास करणें ; संगतींत राहणें . २ कच्छपीं लागणें ; मागें मागें असणें ; गुलामवृत्तीनें अनुकरण करणें . - ळास अपकीर्तिअपयश - दारिद्र्य - आपत्ति येणें - अपमान , गरिबी , दुर्लोकिक इत्यादि प्राप्त होणें ; नांव बद्दु होणें . - ळ्यास , कपाळीं येणें - नशीबी येणें . ' जरी आलें पतन या कपाळाला । ' मोआदि १० . ८२ . -: ळीं कांटीं घेऊन जाणें - निघुन जाणें ; चालतें होणें ; काळें करणें . - ळीं डाग लागणें - बेअब्रु होणें ; फजिती होणें ; कलंक लागणें . - ळीं डाग लागणें - बेअब्रु होणें ; फजिती होणें ; कलंक लागणें . - ळीं भद्रा असणें - नेहमीं दुदैवी असणें ; प्रतिकुल प्रह असल्यामुळें दरिद्र्य येणें . - ळीं लिहिलेलें असणें - नशीबी असणें ; प्राक्तनांत असणें ; योग येणें . ' माझ्या कपाळी आपली सेवा एवढीच लिहिली होती .' - एक १२२ . - म्ह० १ कपाळभर कुंकूं व हातभर बांगड्या - सुवासिनीपणाची स्थित ; सौभाग्य . २ ( ल .) केवळ कुंकवाचा धनि म्हणुनच जीस्त्री नवर्याला मानते अशा स्त्रीच्या बाबतींत योजतात . ०कटकट स्त्री. तोच तोच विषय पुन्हा पुन्हा सांगत बसणें ; कर्म कटकट .' आतां मी जातें आणि त्या पोरीजवळ कपाळकटकट करीत बसतें .' - पिंगला नाटक . ०करटा करंटा - वि . दुदैवी ; अभागी ; दैवहीन ; जुना वरच्या कपाळावर आंगठ्याखाली झांकण्याइतपत पांढरा टिकळा असल्यास तें अशुभ , कपाळकरंटें समजतात . ' काळें तोंड करी कपाळकरटे जा , खेप आणी दुजी । ' - आठल्ये . ०कष्टी स्त्री. १ अति त्रास ; अतिशय श्रम , ( मूर्ख किंवा हेकेखोर मनुष्याची समजूत घालण्यासाठीं पडणारा ); डोकेफोड ; उरस्फोड . २ एकाच गोष्टीचा नाद , हट्ट ; एकसारखी बडबड - वटवट ; खिसखिस ; धरणें धरून केलेली मागणी . कपाळकूट खटखट पहा . ( कपाळ + कष्ट ) - वि . थकवा आणणारें ; त्रास देणारें ( काम ); असें काम करणारा . ०कांठी स्त्री. ( विणकाम ) वही ( ओवी ) किंवा चाळा ज्यास पक्कें केलें आहे . किंवा बांधलें आहे असें आडवें लांकूड किंवा दांडा . हें मागच्या वर असतें . ०कूट स्त्रीन . १ माथेफोड ; शिकविण्याचें फुकट श्रम . कपाळकष्टी पहा . ' कपाळकुट जाहालें लोकीं बोभाट ऐकिला । सांवळे । ' - भज ८ . २ वटवट ; बडबड ; एकसारखी विनवणी , याचना . ' एकदां तिनें दाराची कडी लावली कीं कोणी कितीहि कपाळकुट करो , इला कडी काढील तर शपथ !' - इलासुंदरी १५ . ०क्रिया स्त्री. यति संन्यासी वगैरे मृत झाल्या वर समाधी देण्यापूर्वी मस्तकावर शंख आपटून मस्तक फोडण्याची क्रिया ; कपाळमोक्ष . ०खटखट स्त्री. त्रास ; उद्वेग कपाळ . कूट पहा . - ळाचा डाग - पु . ( कपाळवरील काळा डाग ; दुर्लोकिक ; अपकीर्ति ; कलंक ; ( क्रि०लागणें , चुकणें , लागू होणें ). ०टेंक टेंकणी ढोंकणी - स्त्री . ( कपाळ टेंकणें ). ( ल .) एखाद्या वर भार ; भरंवसा टाकणें ; अवलंबून राहाणें ; स्वतःच्या आकांक्षाइच्छापुर्ति दुसर्यावर सोंपविणें . ०दुखी स्त्री. ज्यांत सतत डोकें दुखत राहतें असा रोग ; डोकेदुखी ; कपाळशुर . ०पट्टा पु. १ घोड्याची म्होरकी किंवा सरोसरी हिचा एक भाग ; कपाळा वरचा पट्टा . हा मुखपट्याहुन निराळा असतो . ०पट्टी स्त्री. १ कपाळ ; कपाळाचा भाग ; ललाटपटल . ' विधात्यानं प्राणि मात्रांचं अदृष्ट डोळ्यांला न दिसणार्या कपाळपट्टीवर लिहून ठेवलं आहे .' - एक ४१ . २ कुंचडें कानटोपी इ० चा कपाळावरील भाग , पट्टी ; टोपीचा कपाळावरील भाग . ३ दरवाज्याच्या चौकटीचें वरचें आडवें लांकूड ; गणेशपट्टी . ४ मोटेच्या विहिरीच्या धावेवरील खांबावर असलेलें आडवें लांकुड . ५ कोणत्याही यंत्ररचनेंतील आडवें बहाल . ६ ब्रह्मालिखित ; ब्रह्मादेवानें कपाळीं लिहिलेलें ; निशिबी असलेलें . ( कपाळ + पट्टी ) ०पांचशेरी पांसरी - स्त्री . न टळणारी दैवगति ; अटळनशीब . नशिबाचा दाखला कशानेंहि बदलत नाहीं असा . ' कोठेंहि गेलां तरी कपाळ पांचशेरी बरोबर .' ( कपाळ + पांचशेरी = चरितार्थ ) ०पाटी कपाळपट्टी १ पहा . ' तीची असे सज्ज कपाळपट्टी । ' - सारुह ५ . ११० . ०फुटका वि. कपाळाकरंटा ; दैवहीन ; कमनशिबी ; अभागी . ( कपाळ + फुटणें ) ०फोड स्त्री. कपाळकुट ; कपाळकष्टी पहा . ( हा शब्द फार त्रासदायक कामाला लावितात ). ०फोडा स्त्री. कपाळ फोडीचें फळ . ०फोडी पु. एक वनस्पति ; चिरबोटी ; फोपेटी . याचें फळ ( कपाळाफोडा ) वार्यानें फुगविता येतें . लहान मुलें हें फळ कपाळावर आपटून वाजवितात ( कपाळावर फोडणें - म्हणून कपाळ फोडी हें नांव ). ०फोडी पु. डोईफोड्या ; मनजोगें झालें नाहीं म्हणजे कपाळ फोडून घेणारा ; इष्टवस्तु मिळेपर्यंत हट्ट धरून बसणारा ( भिकारी ); आततायी . - वि . कपाळकूट करणारा ; हट्टी ; दुराग्रही अक्रस्ताळ्या ; अंकाडतांडव करणारा . ०माळा उद्गा . कल्पनातीत वाईट अवस्था पाहून आश्चर्य किंवा दूःखदर्शक उद्गार . - स्त्री . रुंडमाळा ; शंकराच्या गळ्यांतील नरमुंडाची माळा . ' जटा विभूती उटि चंदनाची । कपाळमाळा प्रित गौतमीची । ... तुजवीण शंभो मज कोण तारी । ' - शिवस्तुति . ०मोक्ष पु. १ प्रेत जळत असतां कपाळाची कवटी फुटण्याची क्रिया . २ मृत संन्याशाच्या डोक्यावर शंख आपटुन मस्तक फोडण्याची क्रिया . ३ डोक्यास आकस्मिक होणारा एखाद्या वस्तुचा आघात ; डोकें फुटणें . - करणें - ठार मारणें . ' मनोहराला स्वर्गी पाठवावें म्हणुन त्याचा कपाळमोक्ष करण्याचा मी प्रयत्न केला .' - मतिविकार . ४ काशीक्षेत्रांतील पांच मुख्यं तीर्थांपैंकी एक तीर्थ . - होणें -( ल .) मरणें ; अंत होणें .' खरी वेळ आली म्हणजे या भीमाच्याच लत्ताप्रहारानें त्या धर्मभ्रष्टाचा कपाळमोक्ष होणार हें मला पक्कें दिसत आहे .' - कीच . ०रेखा रेषा लेख - स्त्रीपु . नशीब . दैव ; विधिलिखित ( विधीनें कपाळावर लिहून ठेवलेलें ०शुल सुळ - पु . कपाळदुखी पहा
|