|
पु. लेख ; लिखित ; लिहिलेला कागद ; हुकूम ; आज्ञा . ' बायकोनें बद अमल केला . तुम्हीं अर्ज केला आम्हांस कलम द्यावें .' आंग्रे ३१८ . ( अर . कलम = लेखणी ) स्त्री. ( माण .) मूर्च्छा ; बेशुद्धि . ( क्रि०येणें ) न. १ लेखांतील विशेष मुद्यांबद्दल किंवा गोष्टीबद्दल लिहिलेला तेवढाच भाग ; स्वतंत्र सदर , बाब मुद्दा ; परिच्छेद . ' पुस्तकग्रुह हें एक सुधारणुकीचें मोठें कलम आहे ...' - नि १५ . ' एकट्यावरूनच ... काव्यरचनेस नाक भुरडणें हें अली कडील रसिकांचें पहिलें कलम ठरुन गेले आहे .' - नि १४१ . २ एका झाडांची फांदी डहाळी दुसर्या झाडाच्या फांदीवर लावून कांही कृतिवेशेषानें त्या दोहोंचाही एकजीव करणें ; कलमाचे प्रकारः - १ जिभलीचें कलम - दोन फांद्याचें नुसते लेंखणीसारखें तास घेऊन त्या एकमेंकास जोडणें . २ पाचरीचें कलम - एका फांदीला खांचा पाडुन त्यांत दुसर्या फांदीचा तुकडा पाचरी प्रमाणें मारणें , बसविणे . ३ दाबाचें कमल - फांदीला चीर घेऊन फत पाडून ती मातींत पुरतात , थोड्या दिवसांनीं तिला मुळ्या फुटल्या म्हणजे ही मुळ्यांची फांदी कापुन निराळी लावतात . ४ खुंटीचें कलम - एक जाड बुंध्याचे संबंध झाड कापून टाकून त्या कापलेल्या भागांत आंतील गाभा व साल यांत फट पाडून त्यांत दुसर्या झाडाच्या फांदीचा जाड तुकडा खुंटीप्रमाणे बसविणें . ५ गुरींचें कलम - डोळे भरण्याचें . ६ भेटकलम - दोन झाडांच्या साली काढून आंगें एकत्र जोडुन बांधून एकजीव होईल असें करणें . ३ वरील कलम करण्याची कृति . ४ चितार्याची कुंचली किंवा पेन्सिल ' रजपुत कलम , कांगडी कलम , महाराष्ट्रीय कलम , मोंगली कलम इ० ' - चित्रकला संप्रदाय .' इतकें नाजूक कलम कोणत्या चितार्याजवळ असेल ? - इंप ४४ . ५ बोरूची लेखणी . ' हाती कलम घेऊन पडला ' ऐपो ३९१ . ६ कापा . काप ; तोडातोड ( हात , पाय , वगैरेची ); झाडांची खच्ची किंवा छाटाछाटी . ' हे ज्योतिषी व त्याचें पुरस्कृतें यांचे आमच्या कर्मठ राजांचें कारकीर्तींत खचित हात कलम केले असतें .' - वि . वि . ( क्रि०करणें ) ' द्राक्षांच्या दुसर्या छाटणीच्या वेळेस फांदी जितकी जुन असते तितई ठेवुन बाकीची छाटतात यास कलम म्हणतात .' - शेतकरी २ . ११ . ७ रकाना . ८ कायद्याच्या पुस्तकांतील प्रत्येक नियम ; कानू : परिच्छेद ; ' पिनल कोड कलम ४३५ . प्रमाणें अपक्रियेचा अपराध वामनरावाचे मार्थी बसला .' - विक्षिप्त १ . ४३ . ९ ( कु ,) ( सोनारी धंदा ) पच्ची करण्याचें एक हत्यार . १० दुकानदारांचा परस्पर उधार देवघेवीच्या हिशेबांतील मुदत ही १ महिना १०दिवस किंवा १॥ महिना असते . त्यानंतर उधार रकमेवर व्याज आकारला त्यास मुदत संपल्यानंतर कलम पिकलें असें म्हणतात . ११ ( ल .) पत्र ' चाललें कलम फौजचें । राऊत पायदळाचे । ' ऐप २३० . ( अर . कलम = बोरु , लेखणी ) पु. ( गो .) तेलामुळें भांड्याला आलेला हिरवेपणा ; कळंक ( सं . कल्मष ) ०कसाई पु. १ हिशेबनीस ; हिशेब तपासनीस ; पगाराच बटवडा करणें वगैरे कामाचा कारकून ; खर्चोत छटाछाट करून लोकांचें ( लेखणीनें ) नुकसान करणरा इसम ; २ जो आपल्या लेखणीनें ( लेखानें ) लोकांना बुडवितो . तो . ३ कारकुनी डावपेंचात दुसर्याचा गळा गोत्यांत अडकविणारा . ०कुचराई स्त्री. लुच्चेगिरीनें हिशोबांत एखादी बाब गोंवणें , गाळणें ; गबाळेपणानें किंवा घाईनें लेखामध्यें अक्षरें खाणें - गाळणें , ( कलम + कुचराई ) ०जारी १ पत्रें लिहून सैन्याची केलेली जमवाजमव ; नांवनिशी . ( क्रि० करणें ; चालणें ). ' कलम ज्यारीचे घटाव मचले । - ऐपो २१४ . २ विज्ञप्ति ; पत्रलेखन . ' ते कलमजारी करून फौज ठेवूं लागले .' - मराचिथोडा ९ . ( फा .) ०तराश स - पु . हुषार ; चलाख ; लेखणीबहाद्दुर . ( फा . तराश = चाकु ) ०दान दानी - नस्त्री . १ लेखणी व दौत ठेवण्याचें लांकडी घर , ठोकळा , खोबळा ; लांबट पेटी . ( फा . कल्म दान् ) २ ज्या दिवाणाखान्याची मधली तख्तपोशी तबकासारखी सपाट असुन दोन्हीं बाजूंची ( डाव्या व उजव्या हाताकडील ) तख्तपोशी चपराप्रमाणें उतरती असते असा दिवानखाना . ३ फटाक्यांची एक जात ; प्रकार ' कलम दानी एका पेटींत ५०० पुढें असतात .' - मुव्यां ११८ . ४ ( इमारत ) हवा आंत खेळण्यासाठी भिंतीत केलेली खिडकीवजा योजना . ५ दरवज्याच्या झडपेमध्यें फळींची चौकत करून आंत नक्षीदार अगर एखादी आकृति काढून पातळ फळी भरून तयार करतात तें . ०बंद - वि . पत्रीं नमुद ; लेखनिविष्ट ; लिखित . ' तेच मजकूर येक . जरा तफावत न करितां कलमंबंद केलें . ' - रा १ . ४४ ( फा .) ०बंद क्रि . लिहून घेणें ; टिपुन ठेवणें ; टाक गुंतविणें . करणें क्रि . लिहून घेणें ; टिपुन ठेवणें ; टाक गुंतविणें . ०बंदी वि. १ अनेक प्रकारची अनेक कलमें निर्णयपुर्वक जयंत बांधून दिलीं आहेत तो लेख ; निरनिराळीं खाती , सदरें व बाबी निरनिरळ्या कमलाखाली लिहिलेली याद ( यांत हुकुमाची , कबुलायतीच्या किंवा कराराच्या कलमांची नोंद असतें ); विषयावर नोंदणीं ; सर्व तपशीलांच्या बाबींची एकाखाली एक क्रमाणें केलेलीं नोंद . २ कलमजारी पहा . ०बहाद्दर वि. लेखणीशुर ; हुषार लेखक ; तरबेज कारकून . ०बाज वि. १ कलम चालविणारा ; फरडा . २ सर्व कलमें अथवा बाबीं . नियम यांत निष्णांत ' कायद्यांच्या कलमबाज शब्दार्थानें ...' - अभ्युदय ता . ३० . ११ . २८ . ०वार - क्रिवि . ज्यांत एकामागून एक सर्व अटी , बाबी लिहिल्या किंवा सांगितल्या आहेत अशा तर्हेनें ; बाबीमागून बाब याप्रमाणें सूक्ष्मपणें व विशेषपणे ; तपशीलवार ; विषयावर . ०सफाई - स्त्री . वळणदार लिहिणें ; सुंदर अक्षर ; कारकुनी हात . ( फा .) ०सुत्रा वि. लेखनकुशल ; लेखननिपुण . ( अर . कलम + सं . सूत्र )
|