Dictionaries | References क कळासी Script: Devanagari See also: कळाशी Meaning Related Words कळासी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kaḷāśī or sī f A close and neat adjunction or interjunction of two pieces, a mortising, a dove-tail, a suture &c. कळासी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कौशल्य कळास पहा . ' युक्तीनें , कळाशीनें मोचेंबेंदी केली .' - भाव १५ . स्त्री. १ दोन लांकडें किंवा दगड यांचा एकाशीं एक घट्ट व नीट बसविलेला सांधा , संधि . २ सांध्याच्या बेमालुम जोर ; एकसंधीपणा . ३ असा सांधा करण्याकरितां दोन्ही वस्तुंचा जोडाशीं येणारा सफाईदार केलेला पृष्ठभाग . ' सांध्यात दर्शनी बाजूपासुण निदान तीन इंच कळाशी असावी .' - मॅटर ३४ . ४ कळाशी करण्याची हत्यार . ५ ( गो .) ( सुतारी ) खिळा असलेली बारीक काठी , हिनें लाकडावर खोल रेघा काढतात ; ठेवण ; फावडी ; आखणी ; खतावणी . ६ ( व .) नांगराच्या दांतास फाळ पक्का बसविण्याकरितां घालावयाची लोखंडी कडी . ७ कायमपणा ; बेमालुमपणा . ' अझुणिहि न वचे हा चंद्र अस्ताचलासी । यदुपतिविरहाची बैसवीली कळासी ॥ ' - सारुह ३ . ११० . ( कला ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP