Dictionaries | References

कवडा

   
Script: Devanagari
See also:  कडोसा , कवडसा

कवडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kavaḍasā or kavaḍā m Rays shining in at the door or a window, or through the roof or any crack or chink: also reflected rays or light: also shadow of the lamp-vessel, or, at night, of a bedstead, a man, and some other objects of shadow boding and dire.
Ex. आपले कवि- त्वाचा क0 मिरवी सधन सभेपुढां ॥.

कवडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The francoline partridge, a large sort of cowrie. A dusky film over the eye. Ragged clouds.

कवडा     

 पु. एक पक्षी ; कपोत ; होला ; होलगा ; हा अनिष्टसुचक समजतात . हा घरांत शिरला असतां कपोतशांति करतात . ' जळी तळपतांचि मासा । कवडा झेलुनि ने आकाशा । ' - एभा २२ . ७२८ . ' हा न भला बुडवाया शिरला या राजमंदिरीं कवडा । ' - मोसभा ४ . २७ . ( सं . कपोत )
 पु. १ मोठी कवडी . ' आयुष्याचें तीन कवडे । विषयाचें चाडें कदान न करी । ' - एभा ३ . ५६१ . ' जैसा वेश्‍याभोगीं कवडा वेंचे । मग दारहि चेपूं न ये तियेचें । ' - ज्ञा ९ . ३२९ . ' नुसता पोरवडा । घरीं न कवडा चित्तीं बरा नीवडा । ' - आसु . ४९ . ' नेदी फुटका कवडा । चोरीं घातला दर्वडा ' - दावि २८४ . २ ( ल .) डोळ्यावर येणारा सारा ; डोळ्यांतील फूल ; कवडी . ३ विखुरलेले , विस्कळित मेघ . ढग . ४ ( चांभारधंदा ) गिरणींतील साच्यांस लागणारें कातडें . ५ दह्याचा किंवा नासलेल्या दुधाचा घट्ट व कापतां येणारा गोळा ; गांठ ; गठळी . ' दुग्धीं कांजीचा थेबू पडे । तेणें दुग्धाचें होती कवडे । ' - भारा १० . ३७ . ( सं . कपर्दिक )
०मिरविणें   क्रि . निषाणी , चिन्ह , लक्षण दाखविणें , खेळणें ( देवीचा भुत्या किंवा आराधी देवीचा अलंकार म्हणुन आपल्या गळ्यांत कवड्यांची माळ घालतो यावरुन कोणत्याहि गोष्टीचें वैभव मिरविणें . ' आपले कवित्वाचा कवडा । मिरवी सधन सेभेपुढें । ' ०गहूं कवड्या गहूं - पु . एकप्रकरचाक गहूं खपल्या गहूं पहा .

कवडा     

कवडा मिठास जातो
(को.) पावसाळ्‍याच्या आरंभी कवडा हा पक्षी कोकणांत ओरडतांना ऐकूं येतो. कवडा ओरडूं लागला म्‍हणजे पर्जन्य लवकर येण्याचे चिन्ह दिसूं लागते. तसेच, पाऊस सुरू होण्यापूर्वी कवडा पावसाळ्याच्या बेगमीचे मीठ आणावयास जातो
तेव्हां तो गेला म्‍हणजे समजावे की, लवकरच पाऊस सुरू होणार. अशी कोकणात समजूत आहे. ‘कोंका मिठास गेला’ असेहि म्‍हणतात.
कवडा मिरविणें
देवीचा भुत्‍या किंवा आराधी देवीचा अलंकार म्‍हणून आपल्‍या गळ्यांत कवड्यांची माळ घालतो
त्‍यावरून कोणत्‍याहि गोष्‍टीचें वैभव मिरविणें. ‘आपल्‍या कवित्‍वाचा कवडा। मिरवी सधन सभेपुढें।’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP