Dictionaries | References

कांकणी

   
Script: Devanagari
See also:  कांकण

कांकणी

   नस्त्री . कंकण ; १ बांगडी ; पाटली बायकांच्या हातांतील सोन्याचा एक दागिना ; कंगणी ; मनगटाचें भुषण , अलंकार . ' घोसाळा कांकणचा हातीं । नारीं सडें घालितांती । ' - शिशु ५९० . ' कां नाटितां कांकण । सोनेंचि तें । - ज्ञा १४ . ३७८ . ( सं . कंकण ) म्ह० हातच्या कांकणास आरसा कशाला ?
   ( गो .) अर्धें कणीस .
०घालणें   भरणें - हातांत बांगड्या भरणें .( ल .) बायकी , भागु बाई , भ्याड पुरुषास लावतात . ' कांकणें आम्हासम हातीं । ' भरलेली कां हो होतीं । ' संग्रामगीतें ४२ .
०फोडणें   ( गो .) १ वैधव्य आणणें . २ कडक शिक्षा करणें .
०वाढणें   वाढविणें -( बायकी ) बांगड्या पिचणें , फुटणे , ( कांकन हा सोभाग्यालंकार असल्यानें त्यास फुटणें न म्हणतां उलट वाढणें , वाढविणें असा प्रयोग करितात . उ० कुंकू वाढविणें - वाढणें इ० )
०कार  पु. ( गो .) बांगडी कासार ; बांगडीवाला . कांकणवाला पहा .
०कोर  न. ( ना .) बांगडीच तुकडा .
०घोण  स्त्री. ( गो .) गोम ; घोण .
०भर   दोन काकणें - थोडें अधिक , जास्त ; दोन वस्तुंची तुलना करतांना एकीचें दुसरीवर किंचिंत आधिक्य दाखविण्यासाठीं योजितात . ' त्यापेक्षा हा कांकणभर जास्त होईल .' ' पुरुषाइतकीच किंवा कांकणभर जास्तच बुद्धिमत्ता असुन कित्येक शतकें आम्ही विचार करावयाचे सोडुण दिलें .' - विविधवृत्त ( खास अंक १९२८ ) २ ( सामा .) अल्पप्रमाण . कांकणभरानें - र्‍यानें अशींहि रुपें आढळतात .
०वाला  पु. बांगड्या भरणारा ; कासार . ' कांकणवाले फुलारी कासार । ' - दावि ४८८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP