Dictionaries | References

कांटा

   
Script: Devanagari
See also:  काटा

कांटा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कठिनाई, लौंग, काँटा, तराजू, काँटा, काँटा, काँटा, कँटिया, काँटा, काँटा, काँटा

कांटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Expresses the rising of a great evil out of a small one. कांट्यानें कांटा काढणें To employ one hateful person or thing to destroy another.

कांटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A thorn. Balance. A pest. Erection of the hair of the body. The tongue (of a lock). The back-bone The hand of a watch. Congelations or crystals.
कांटा उपटणें   Pluck up the very root ofany mischief or mischievous person.
कांट्याचा नायटा होणें   The rising of a great evil from a small one.

कांटा     

 पु. १ अणकुचीदार , तीक्ष्ण टोंक असलेली , जी बोचली असतां अक्त काढते अशी काडी ; बाभळीचा बोरीचा दाभणासारखा टोंचणारा अवयव . सर्प कपाळी कांटा नेहटे । कां सापसुरळीचें पुच्छ तुटे । ' - भारा बाल ८ . ३५ . २ ( भयानें थंडीनें वगैरे ) अंगावर उभे राहणारे शहारे ; रोमांच ३ ( अव .) तापानंतर अंगावर खरखरेतपणा अथवा बारीक पुटकुळ्या असतात तो ; पुरळ ; ४ ( अव .) तापाच्या पूर्वी अंगावर येणारी शिरशिरी ; रोमाची ; कसर . ५ विंचवाच्या नांगीचें पुढचें तीक्ष्ण टोक . ६ कुलुपादिकाचा खिळा , जो कुलुपाच्या दांडीत वसतो व मागें सरतो तो . ७ वेळूं बांभू वगैरेना . येणारातुरा ; मोहोर ; फुलोरा . ८ कंबर , मान पाठ यांच्या आंतील बाजूस आधारभूत असलेला आस्थिविशेष . ९ गुणकार भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठी अंक मांडण्याकरितां घातलेली चौफुली (*). १० राघु , मैना इत्यादिकांच्या गळ्यांत होणारा एक रोग . ११ वजनानें विकलेल्या वस्तू वरं जे कांहीं वजन कटतें देतात तें कडता पहा . १२ नदी किंवा समुद्रांतील पाण्याखाली झांकलेला खडक . १३ काट्यासारखी शरीरास बोचणारी कोणतीहि वस्तु ( माशाचें हाड . चक्राचा दांता , घड्याळ्याचा हातकांटा , खडबडीत लागामाचें टोंक , करवतीचा दांता , जेवणांतील वापरावयाचें दांताळें - कांटा , जनावरें किंवा भाजीपाला यांवरील खरखरीत केंस . लव इ० ) ' काटा बराबर एकावर एक आला . - रासक्रीडा ७ . १४ हलवा , इतर मिठाई यांवरील टोंके , रवा ( क्रि० येणे ; उमटणें ; वठणें ; उठणें ). १५ ( विणकाम ) वशारन करतांना इकडून तिकडे ( वशारन पुढें सरकण्यासाठी ) फिरवावयाचें लांकूड १६ ( व .) थेंब . ' घरांत तेलाचा एक कांटा नाहीं .' - वशाप ५१ . १२ . ४७८ . १७ ( कु .) सुताराचें एक हत्यार . १८ ( ल .) त्रास देणारा माणुस व्याधि , शल्य , पीडा , शत्रु . ' धर्मांच्या हृद्‍यांतिल काढितसे मी समुळ कांटा हो । ' १९ तराजुच्या दाडीमधील उभा खिळा . ' जरि कांटा कलताए दैवांचा । जेडता राजमठु । ' - ऋ ३९ . २० काटा असलेला तराजु ( विशेषत ; सोनाराचा सराफाचा ). ' मेरुचिया वजनास पाहीं । कांटिया वातली जैशी राई । ' - ह . ३० . १६१ . ( सं . कंटक , प्रा . कंटओ . अप . कंटउ ; त्सीगत ; फ्रें जि . कंडो . ते काटा )
०उपटणें    १ ( क . व .) त्रासदायक प्राणी , शत्रु , गोष्ठ , नाहींशी होणें . २ ( व . ष .) समुळ नाहींसा करणें . काढुन टाकणें
०काढणें   आपल्या मार्गांत असलेल्या आपणांस पदोपदी नडवणार्‍या शत्रुस दुर करनें . ' वसुदानाच्या पुतें जो अभिमुख काशिराज तो बधिला । कांटाचि काढिला तो जाणो तब सुनुच्या मनामधिला । ' - मोकर्ण ४ . १५ .
०मारणें    १ काट्यानें सिद्ध करणें . २ अंगांत ( तापाची ) कसर येणें .
०मोडणें    १ ( व .) विंचु चावणें . २ किंचित उष्ण होणें . ' थंड पाण्याचा थोडा कांटा मोडला .' कांट्याचा नायटा होणें - कांटा मोडल्यावर लगेच तो काढला नाहीं तर त्या ठिकाणी नायटा होतो म्हणजे आरंभी क्षुल्लक वाटणार्‍या वाईट गोष्टीचे पुढे मोठे हानिकारक परिणाम कधीं कधीं होतात . कांट्यानें काटा काढणें - एका दुष्टाच्या हातून परभारें दुसर्‍या दुष्टाचें शासन होईल असें करणें . ' काट्यानें काढितात काटा की , ' काट्याप्रमाणें सलणें - सतत त्रासदायक होणें ; दुःखकारक होणें ; मत्सर , हेवा , द्वेष वाटणें . काट्यावर ओढणें - दुःखांत घालणें ; वस्त्र कांट्यावर ओढलें असतां फाटतें त्यावरुन . काट्यावर घालणें - दुःखांत लोटणें . ' त्यात ( कौरव सैन्यांत ) मरेनचि शिरतां कांट्यावरि बालितां चिरे पट कीं । ' - मोविराट ३ . ४१ . कांट्यावर येणें -( बैलगाडी ) आंसाच्या दोन्ही बाजूंला समतोल वजन होणें .
०धारवाडी   अगदीं बरोबर तोल दाखविणारा कंटा .' टिका करणार्‍याच्या हातांत नेहमीं धारवाडी कांटा असला पाहिजे .' कांटेकाळजी - अतिशय सुक्ष्म काळजी ; चिंत्ता . ' नवीन गव्हर्नर हे काट्याकाळाजीनें व निःपक्षपातबुद्धिनें आपलें काम करतील . ' - टि १ . ४३३ .
०भर   ( वायकी ) थोडे . ' आज तिच्या दुखण्याला कांटाभर मागचें पाऊल आहे .'
०रोखण   स्ती . ( कु ,) लांकडांत खांच , रेघ , पांडण्याच्या उपयोगी सुताराचें एक हत्यार ; खतवाणी ; फावडी .
०कणगी   ( गो .) कणगर ; कनक पहा .

कांटा     

धारवाडी कांटा
अगदी बरोबर तोल दाखविणारा तराजू.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP