Dictionaries | References

कारसाई

   
Script: Devanagari
See also:  कारसई

कारसाई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
levied for the service of a fort from the villages dependent; also of fodder, pegs, fruits &c. for a village-officer when he travels. According to a brief list these items are इरलें, तवसें, काळा भोपळा, कोन & करांदें, इरसाल फणसपोळी, आंबसोल, दोरगगुंडे, चुडी, वांसे, चिवली. See the exactions of the खोत or Landfarmer under खोतवेठ. 3 Clever scheming and contriving. v कर, चालव.

कारसाई     

 स्त्री. १ रयतेला दिलेली तगाई ; ही सुगीच्या वेळीं धान्याच्या रूपानें परत करण्याच्या बोलीवर देतात . २ किल्ल्याच्या घेरांतील ( टांपूंतील ) खेड्यांतील लोकांकडुन किल्ल्यावर असलेल्या सरकारी इमारतींच्याशाकारणीसाठें , चुड व इरलीं करण्यासाठीं बसविलेला सरकारी कर . ह्यांत गवत , नारळीच्या सावळ्या , पानें , कारव्या , बांबू वगैरे सामान असतें . तसें महालाचा अधिकारी फिरतीवर असतांना त्याच्या उपयोगासाठीं लांकुडफांटा , जवळ फळफळावर भाजी वगैरे गांवकर्‍यांनीं पुर वावयाचें सामान . ( एका जुन्या यादींत पुढील कारसाईचा ( वस्तुंचा ) समावेश केलेला आढळतोः - इरलें , तवसें , काळा भोपळा , कोन , करांदे , इरसाल फणसपोळी , आमसोल , दोरगुडंए , चुडी , वोस , चिरली वगैरे ). कुळाकडून गवत , लांकडें फुकट घेण्याचा हक्क . खोतवेठ पहा . ' कारसाई किल्ले रायेगड येथील शाकारणीबद्दल वगैरे गांवगना नेमणुक आहे ते ' - मसाप २ . २ . १५१ . ३ गुप्त कट ; उलाढाली ; कारस्थानें . ( क्रि०करणें ; चालवणें ). ( सं . कृषि ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP