Dictionaries | References

कुडा

   
Script: Devanagari
See also:  कुंडा , वाळका , वाळकुंजा

कुडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
is classed amongst the उपधान्यें and is a vermifuge &c. 2 A sort of rice. 3 A certain ear-ring of females. 4 A tree, Hymenodyction excelsum. Grah.
False or bad gen., i. e. evil, harmful, wrong &c. Ex. पाहिलें परतोनी दुष्टा काळाकडे ॥ मग म्हणे कुडें झालें आतां ॥ तुका म्हणे कुडी प्राणाची आवडी ॥.

कुडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A medicinal shrub.
  False, guileful, malignant, treacherous.

कुडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक रानटी झाड   Ex. ह्या जंगलात कुज्याची झाडे खूप आहेत.
ATTRIBUTES:
रानटी
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
इंद्रजव
Wordnet:
gujઇંદ્રજવ
hinइन्द्रजौ
kasاِنٛدرٛجو , اِنٛدرٛجَو , کُرییا , کُڑا , وَتٕس , وتسک , اِنٛدرٛپھَل , کُٹَج , یَوپھَل , یَوکلش
oriଇନ୍ଦ୍ରଜୌ ଗଛ
panਇੰਦਰ ਜ਼ੌਂ
sanकुटजः
urdاِندرجو , کُوریّا , کُوڑا , اِندرپھل , کُوٹج , شکرا , شُدھا , کُرچی , شکرشُدھا , شکربیج , اِندر , یوپھل

कुडा     

 पु. हें रानझाड सहा - सात हात उम्च असून पान बदामाच्या पानासारखें लांबट असतें . याच्या विड्या करतात . शेंग बारीक व लांब , असुन बींलांबट यवासारखें व कडु असतें , मुळांचा औषधीसारखा उपयोग होतो . त्याच्या पाकास कुडेपाक म्हणतात . कुड्यांच्या पांढरा व काळा अशा दोन जती आहेत . बीची उपधान्यांत गणना होतें . तें कृमिनाशक आहे . कोंवळ्या शेंगाची भाजी करतात . ( सं . कुटज )
वि.  १ कोरडा ; शुष्क ; नीरस ; रुक्ष ; सुका ; सुकट . २ किडकिडीत ; बारीक ; कृश ; रोडका ; काटकुळा . [ वाळणें ]
 पु. १ भाताची एक जात . २ स्त्रियांच्या कानांतीलक एक दागिना ; कूडें .
वि.  १ दुष्ट ; शबल ; कपटी ; विश्वासघातकी . ' विवेकें कुडी कल्पना पालटीजे । ' - राम ४० . २ ( काव्य ) वाईट ; खोटा ( पैसा ). ' कुडा आपुला दाम अस्तां पराशीं । वृथा भांडणें ख्यात हें गोष्ट कैशी । ' - हरिराज मुद्रलार्यीचें भाषांतर ४७ .( अकक ). ३ ( काव्य ) मिथ्या ; अशुद्ध ; खोटा ; वाईट , नुकसानकारक , चुकीचा . ' नृपातें कुडा मंत्र योजावयातें । ' - वामनविराट ७ . १३० . ' तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी ते कुडी । ' - दा . ३ . १० . ६७ . ( सं . कूट )
 पु. १ मोठी कुंडी ( फुलझाडाची , चांभाराची कातडें भिजत घालण्याची , रंगार्‍याची ); उंसांच्या रसाचें मांदण ; भांग , तपकीर इ० तयार करण्याचें पात्र . ' जवळच वटवृक्षाची डहाळी लावलेली कुडां ठेवला असतो . - ऐरापुप्र . ८ . ४४५ . २ माडी काढण्यासाठी माडाला बांधलेला भोपळा . ( सं . कुंड )
०भाव  पु. द्वेष ; मत्सर ; अविश्वास ; संशय ; कपट ; दुष्ट कल्पना ; विकल्प .

कुडा     

कुड्याचें कुडें, त्‍याचें पुढें
[कुढें=कपट
कुढा=कपटी, वाकडा] ज्‍याचे कपट त्‍याच्याच गळ्यात येणें
दुसर्‍याच्या नाशार्थ केलेल्‍या कपटी कारस्‍थानांत स्‍वतःच सापडून नाश होणें. पाठभेद-ज्‍याचे कुडे त्‍याचेच पुढे. कुडें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP