Dictionaries | References क कोष्ट्याच्या काखेंत दीड ताणा, कोष्टी चाले उताणा Script: Devanagari Meaning Related Words कोष्ट्याच्या काखेंत दीड ताणा, कोष्टी चाले उताणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) [ताणा=कापड] विणण्याचे सुताचे बंडल. कोष्ट्याजवळ दीड ताणा, थोडेसे सूत असले की बसतेवढ्याने आपण श्रीमंत झालो असे वाटून तो उताणा चालूं लागतो, म्हणजे गर्विष्ठपणाने वागतो. थोडक्याने ताठा अंगी आणणारास ही म्हण लागते. तु०-कांगे म्हरणी उताणी शिंगट भरले नाचण्यांनी. कांरे महारा उताणा खिशांत दीडआणा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP