|
खडीसाखर पहा . स्त्री. १ लहान दगड ; सडकेवर घालण्याची गिट्टी रस्त्यावर घालण्यासाठींमोठें दगड बारीक फोडुन त्यांची खडी करतात . २ ( कु .) लाकडी तुळईखाली बसविलेला दगड . ( खडा ) स्त्री. माणसाचें दुखणें पिशाच्चबाधेपासुन आहे किंवा काय हें ठरविण्यासाठीं करावयाचा विधि ; देवभक्त पिशाच्च पाहण्यासाठीं गहुं , तांदुळ यांची एकीबेकी करुन पाहतात , ती समसंख्या आल्यास बाधा आहे व विषम आल्यास नाहीं असें समजतात . स्त्री. ( माण .) १ उंचवटा ; टेकडी . २ खालाटी ; सह्याद्रीच्या पश्चिम बाजूची पायथ्याची डोंगराळ जमीन घाटाखालील कोस - दोन कोस डोंगरावट जमीन . वि. खडा पहा . १ उभा - भी - भें . २ खरा - री - रे . ३ स्पष्ट ; सडेतोड . स्त्री. ( खा .) खार ; चानी . स्त्री. १ लिहिण्याच्या धूळपाटीवर घासण्यासाठीं अथवा भिंटीला रंग देण्यासाठी अथवा भिंतीसाठी लागणारी माती ; चिकण - पांढरट दगड ; खडीचा दगड ; खडुची माती . - पदाव ३७ . ' खडीचा रंग चुन्यासारखा तयार होतो .' २ कापडावर नक्षी काढण्यासाठीं केलेलें मिश्रण ( गोंद , अभ्रक ); एक चिकट रंग . ३ या मिशरणानें काढलेला नक्षी , आकृति ; खणांवर , चंद्रकळांवर खडी काढुन घेतात . ( सं - खडी = खडू ) ०किंमत स्त्री. स्थिर ठोक किंमत .' सोन्या रुप्याची खडी किंमत .' ०खट वि. ( माण .) स्पष्ट ; सडेतोड , खडींखापरीं - खटीखापरी पहा . ०चाकरी स्त्री. सततची , एकसारखी , विश्रांति नाहीं अशी नोकरी . ०चोट क्रिवि . त्याच जागीं ; त्याच क्षणीं खडाखडी . ०ताजीम स्त्री. सन्माननीय पाहुन्यांचे आगमनप्रसंगी त्यास पद्धतशीर दिलेले उत्थापन ; पुरी ताजीम ; याच्या उलट निम ताजीम . ' गुरुजीस पाहुन व त्यास खडी ताजीम दिल्यानंतर .' - परिभौ ४७ . ०तैनात स्त्री. खडी चाकरी पहा . ०दुपार स्त्री. ऐन मध्यान्हकाळ . ०फौज स्त्री. सतत तयार - नोकरींत असलेली फौज . ०रेघ स्त्री. मोडी लेखणांतील एक प्रकार ; खडे पहा . ०हुंडी स्त्री. न वटविलेली न स्वीकारलेली हुंडी . खडी हुंडीक राखणें - हुंडीचा स्वीकार न करितां किंवा खोटी न म्हणतां ती आगळ राखणें .
|