Dictionaries | References

गडं च सास्‍वडं चैव, स्‍वास्‍वडं च गडस्‍तथा

   
Script: Devanagari

गडं च सास्‍वडं चैव, स्‍वास्‍वडं च गडस्‍तथा     

सबंध श्र्लोक असा-गडाच्च सास्‍वडं यामि, सास्‍वडाच्च पुनर्गडम्‌। गडसास्‍वडयोर्मध्ये द्राविडो लुडबुडाम्‍यहम्‌।। सवाई माधवराव पेशवे लहान असतां त्‍यांचा मुक्‍काम पुरंदर गडावर असे व पायथ्‍याशी सासवड येथे कारभारी नानाफडणीस राहात असत व ते वरचेवर पुरंदरावर जाऊन येत. अशा वेळी एक तेलंगी ब्राह्मण दक्षिणा मिळावी म्‍हणून आला असतां तो पुरंदरावर गेला म्‍हणजे कारभारी सासवड येथे आहेत तेथे जा, असे सांगण्यात येई
व सासवड येथे गेला म्‍हणजे ते गेले गडावर तेथे जा असे सांगण्यात येई. याप्रमाणें त्‍यास गड व सासवड यांमध्ये अनेक हेलपाटे पडले. ही गोष्‍ट त्‍याने वरील श्र्लोकात व्यक्त केली आहे. यावरून काही कार्य न होतां इकडून तिकडे व तिकडून इकडे असे व्यर्थ हेलपाटे पडणें असा अर्थ व्यक्त होतो. टोलवाटोलवी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP