Dictionaries | References

गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा

   
Script: Devanagari

गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा     

प्रत्‍यक्ष गाईला सुरा घेऊन कापणारा कसाई दुष्‍ट खरा पण त्‍यापेक्षांहि जो मनुष्‍य आपल्‍या लेखणीनें खोटेनाटे लिहून एखाद्याचा घात करतो तो अधिक अनर्थावह असून तो मनुष्‍य खाटकापेक्षांहि फार वाईट. गायकसाई एका गाईचाच वध करील पण लेखणीनें अनेक लोकांचा एकदम नाश करतां येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP