Dictionaries | References

गैर

   { gaira }
Script: Devanagari

गैर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : परजन, पराया, पराया, पराया

गैर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An inseparable particle expressing otherness or difference, but generally of privative or deteriorative power. It is attached arbitrarily, though more particularly to words introduced from the Hindustání. It corresponds with dis, un, by. Some of the most useful words to which it is prefixed are inserted in order.

गैर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ind   A particle expressing otherness or difference, but generally of privative or deteriorative power. It corresponds with Disun.

गैर     

अ./वि.  अन्य , इतर ;
अ./वि.  अवास्तविक , उलट , विपरित ;
अ./वि.  अयोग्य , अन्यायाने ;

गैर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अनुचित

गैर     

अ.  निराळेपणा , भिन्नपणा दाखविणारा परंतु सामान्यत : अभाव किंवा अन्यथाभावदर्शक अरबी अव्ययशब्द किंवा प्रत्यय . याचा मनसोक्त ( विशेषत : हिंदुस्थानी शब्दाबरोबर ) उपयोग करितात . या शब्दाचे पुढील कांहीं अर्थ होतात - १ इतर ; अन्य . गैर पथकें येऊन मोर्चेबंदी केली आहे . - रा १२ . १२५ . २ अयोग्य ; अन्यायाचा . हें तुम्हीं गैर केलें . - मदरु १ . १०६ . ३ ( नामाच्या किंवा विशेषणाच्या प्रारंभी जोडल्यास ) अवास्तविक , उलट ; विपरीत . ४ विना ; वांचून . गैर अन्याय मला गांजतो . गैर अपराध दंड घेऊं नये . [ अर . घैर = निराळा , व्यतिरिक्त ] ( वाप्र .) अदबी - स्त्री . असभ्यता ; अपमान ; अनादर . गैर अदबी बोलला सबब पातशाहा यास राग येऊन डोळे काढिले . - मदरु २ . ७० .
०अदा वि.  रद्द ; न पटलेलें . शिंदे कडील वरात आली तर मग गैरअदाही व्हावयाची नाहीं . - ख १० . ५२ . ७९ .
०अब्रू  स्त्री. अप्रतिष्ठा . गैर - अब्रू फारशी न करणें . - वाडबाबा २ . ७५ .
०अमली वि.  परस्वाधीन ; दुसर्‍याचें . चार लक्षाचे भरतीस अमली महालांपैकीं बेरीज कमी आल्यास गैर - अमली महाल आहेत त्यांपैकीं भरतीस कमाल आकाराचे बेरजेचा महाल लावून देणें . - रा . १० . ३२१ .
०आबादी वि.  ओसाड ; उजाड ; बेचिराख .
०आरामी  स्त्री. अस्वस्थता . हज्रतांचे शरिरास दोन दिवस गैराआरामी आहे . - दिमरा २ . ३२ .
०इतबार  पु. अविश्वास . तमाम फौजेस गैरइतबार जाहला . - भाब ८० .
०इमान  न. इमान नसणें ; द्रोह ; अनिष्ठा . आमचें गैरइमान असतें तरी आम्हीं आजपर्यंत येथे तुम्हापाशीं न ठरतों . - भाब १११ .
०कबजी वि.  परस्वाधीन ; गैरअमली पहा . सरंजाम गैरकबजी , कांहीं सुटला त्यांत वस्ती नाहीं . - ख २ . ४२ .
०कायदा वि.  बेकायदेशीर ; असनदशीर . ( इं . ) इल्लीगल .
०कायदा  स्त्री. ( कायदा ) गुन्ह्याचें कृत्य करण्याच्या इराद्यानें पांच किंवा पांचाहून अधिक एकत्र जमलेले इसम . ( इं . ) अनलॉफुल असेंब्ली .
मंडळी  स्त्री. ( कायदा ) गुन्ह्याचें कृत्य करण्याच्या इराद्यानें पांच किंवा पांचाहून अधिक एकत्र जमलेले इसम . ( इं . ) अनलॉफुल असेंब्ली .
०किफायत  स्त्री. तोटा ; नुकसान . किफायत , गैरकिफायत समयासमयास चित्तांत आणून किफायतीचीं कांमें करीत आलां , पुढें त्याचप्रमाणें करावीं - रा १ . ३४६ .
०कौली वि.  परवाना किंवा अभयपत्र न दिलेलें ; बिगर परवाना . - मराआ .
०खर्च  पु. १ जादा , किरकोळ खर्च . २ गैरवाजवी , अयोग्य खर्च .
०खुशी   खुषी - वि . नाकबूल ; नाखूष ; रुष्ट . खुषी किंवा गैरखुषी असा हा कौल बायकांशी । - पला १०४ .
०चलन   चलनी - वि . १ चालू नसलेलें ( नाणें ). २ ( ल . ) अव्यवस्थित ; बेशिस्त ; अशिस्त ( वर्तन ).
०चलन  स्त्री. १ चलनाचा अभाव ; चलन नसणें . २ ( क्क . ) गैर वर्तन ; बदचाल .
०चाकर वि.  बडतर्फ ; माजूल . जखमी जहाले त्यांस गैरचाकर करून जागिरा तगीर करविल्या . - जोरा ७५ .
०जप्त वि.  गैरअमल ; गैरकबजी ; परस्वाधीन . गैरजप्त देश साधावे . - चित्रगुप्त ११० .
०जबाब  पु. उध्दटपणाचें , अनादराचें उत्तर .
०दस्त   दस्ती - वि . सरकारसार्‍याची सूट असलेली ( जमीन ).
०नफा   फायदा - पु . तोटा ; नुकसान . येणेंकडून तुमचा गैरनफा जाहला . - जोरा १४ . अत्यंत वोढ केल्यास पाटीलबावांचा गैर फायदा आहे . - जोरा ४७ .
०प्रकारचा वि.  १ इतर ; भिन्न ; दुसरा . २ चमत्कारिक ; हास्यापद ; तर्‍हेवाईक ; विलक्षण .
०बर्दार वि.  बहार नसलेला ; फळहीन . पोकळी गैर - बदर , शेंडे वाळलेल्या आहेत . - रा ११ . ७९ .
०मजुरा   क्रिवि . ( हिशब ) मजुरा ( वजा ) टाकल्याशिवाय ; वजावाट न करितां . [ गैर + मजुरा - मुजरा ]
०मंजूर वि.  नामंजूर करून एकपक्षी तह केला . - रा १२ . १२२ .
०मर्जी  स्त्री. अवकृपा ; रुष्टता ; इतराजी ; नाराजी .
०मसलत   मनसुबा - स्त्रीपु . मूर्खपणाचा , वेडगळपणाचा बेत , कट , योजना .
०महसर्दार वि.  अप्रतिष्ठित . - रा ८ . ४३ . [ अर . माआसिर = थोरवी ]
०महसूल  पु. जुलमी करापासून किंवा अन्याय्य मार्गानें काढलेला वसूल ; योग्य सरकारसार्‍याबिरहित वसूल . विजापुराहून एक हवालदार गैरमहसूल पैदागिरी कबूल करून आला . - इऐ ५ . १०० .
०माकूल   मूर्ख ; अडाणी ; गैर ; वाईट . कार्बारास खलेल करणें हें गैरमाकूल गोस्टी आहे . - रा १८ . ३३ . - क्रिवि . मूर्खपणें . लोक गैरमाकूल आम्हांस न कळत वर्तले तरी त्याची बदलामी आपणावरी न ठेवावी . - रा ८ . १० .
०मान्य वि.  अमान्य ; असंमत .
०मार्ग  पु. गरशिस्त आचार , रीत ; दुराचरण .
०माहीत वि.  १ अपरिचित ; अनोळखी . २ अजाण ; नेणता . साठे आहेत ते गैरमाहीत . - ख ७ . ३५५१
०माहीतगार वि.  अज्ञानी ; अडाणी .
०मिराशी वि.  वंशपरंपरा मालकी नसलेला . मातकदीम मिरासी खरी जाहली . काणव मजकूर गैरमिरासी मुतालीक ऐसे जाहले . - इऐ ५ . १०२ .
०मेहनत  स्त्री. निरुद्योग . परंतु मेहनत , गैर - मेहनत सर्व एक ईश्वरी क्षोभानें वायां गेल्या . - ऐ ५ . मेहेरबानी - स्त्री . अवकृपा ; इतराजी . सांगितल्यावरून मनांत गैर मेहरबानी न धराबी . - रा ८ . १० .
०मोसम   हंगाम - पु . अवेळ . गैर मोसमांत ( पौष वद्य १२ स ) आंबे आले यावरून कौतुक वाटलें . - रा २२ . ५ .
०रजावंद वि.  नाराज ; नाकबूल . तो क्रियेस गैररजावंद जाहला . - वाडशाछ १३२ . [ फा . ]
०रहा   रीत - स्त्री . बदचाल ; अयोग्य रीत ; वाईट आचरण . - वि . बदचालीचा - सलुकाचा . भुजंगराव याची वर्तणूक गैररहा दिसते . - ख ११ . ५७७६ .
०राजी वि.  असंतुष्ट ; नाराज . पाटसकर गैर - राजी जाले . - रा ६ . २६ .
०राबता वि.  १ बंदी ; मनाई ; खंड ( मार्ग , मिळणे , येणें - जाणें , वहिवाट , चाल यांमध्यें ). नाना फडणीस लष्करांतून आल्यापासून गैरराबता बहुत करूं लागले , कोणाचीच गांठ पडत नाहीं . - ख ८ . ४१५१ . २ वहिवाट , चाल यामध्यें अनभ्यास ; अपरिचय ; अवापर ; वळण नसणें .
०रास्त वि.  गैरवाजवी ; असत्य ; खोटा .
०रुजू वि.  १ गैरहजर . २ मंजूर किंवा दाखल किंवा मान्य न केलेले ( हिशेब ).
०लायक वि.  अयोग्य ; नालायक ; अनुचित .
०वळण  न. १ गैरराबता . त्या मार्गास सध्यां गैरवळण जाहे . २ एकीकडे असणें ; आडवळण ; दळणवळण नसणें . हा गांव गैरवळणांत पडला . ३ गबाळ , वाईट लिखाण . ४ सरावांत नसणें ; संवय नसणें ; निरुपयोग .
०वाका  पु. खोटी किंवा बनावट गोष्ट ; गैरसमजूत ; लबाडी . ऐसा गैरवाका सांगितला . - रा ८ . ५२ . - वि . वेडावांकडा . - शर [ फा . घैर - वाकिअ ]
०वाजवी   वाजिवी - वि . अयोग्य ; अनुचित ; फाजील ; अन्याय्य . त्यांचा अभिमान गैर - वाजवी यांणीं नच धरावा . - रा १२ . ७९ . [ फा . घैर + वाजिवी ]
०वाजवी  पु. ( कायदा ) अयोग्य वजन . ( इं . ) अनडयू इन्फ्लुअन्स .
दाब  पु. ( कायदा ) अयोग्य वजन . ( इं . ) अनडयू इन्फ्लुअन्स .
०वास्तविक वि.  खोटा ; असत्य ; वस्तुस्थितीस सोडून . विलग - क्रिवि . आडबाजूस ; आडवळणी . - वि . ( विलगसाठीं चुकीनें योजलेला ) न मिळणारा ; न जुळणारा .
०विल्हईस   विल्हेस विल्हे - क्रिवि . आपल्या ( योग्य ) ठिकाणाच्या विरुध्द जागीं ; भलतीकडे .
०विल्हेस   , विल्हेस पडणें - १ दुसरीकडे किंवा चुकीच्या ठिकाणीं लागणें ; क्रमवार नसणें . २ योग्य ठिकाणाहून गहाळणें ; गमावणें . ३ गोंधळ होणें , अव्यवस्थित असणें .
लागणें   , विल्हेस पडणें - १ दुसरीकडे किंवा चुकीच्या ठिकाणीं लागणें ; क्रमवार नसणें . २ योग्य ठिकाणाहून गहाळणें ; गमावणें . ३ गोंधळ होणें , अव्यवस्थित असणें .
०शर्ती  स्त्री. माफीजमीन म्हणून ठरविल्यानंतर जिला इतर दुसर्‍या कोणत्याहि अटी पाळावयाच्या नसतात अशी जमीन .
०शिस्त वि.  बेशिस्त ; अव्यवस्थित ; विना रीतभात ; नियमबाह्य ; असभ्य ; फाजील ( माणूस , वर्तन , भाषण ). - स्त्री . बेशिस्तपणा ; अव्यवस्थितपणा ; अयोग्यपणा ; अनियमितपणा .
०शेरा   शरा - वि . धर्मशास्त्रविरहित . काजीपासून गैरशेरा अमल होऊन आला . - वाडसनदा १५ . [ अर . घैर + शरअ = धर्मशास्त्र ]
०संधी  स्त्री. अवेळ ; गैरमोसम ; अवकाळ .
०सनदी वि.  १ बेसनदशीर ; बेकायदेशीर ; सनदेनें अधिकृत नसलेलें . २ जादा मंजुरीशिवाय . गैर - सनदी खर्च करावयाची सरकारची आज्ञा नाहीं . - ख ५ . २३५३
०समजाविशी  स्त्री. ( कायदा ) गैरसमजूत ; ( इं . ) मिसरिप्रेझेंटेशन
०समजूत  स्त्री. उलट , चुकीची समजूत ; चूक .
०सल्ला   सलाह - गैरमसलत पहा . हे कपणी इंग्रजबहादूर यांचे सलाहानें अगर गैर सलाहानें ... - रा २२ . १२५ .
०साल वि.  अनिश्चित वेळेचा ; वर्ष नमूद नसलेला . गुणनवरे यांनी कागद एक काढिला , तो बहुतां दिवसांचा , गैर - साल । - रा ६ . ८९ .
०सावध वि.  १ बेसावध ; गाफील . २ बेशुध्द ; मूर्छित .
०साळ वि.  १ खोटसाळ ; सरकारी टांकसाळींतून न पाडलेलें , इतर ठिकाणचें म्हणजे हिणकस , कमी किंमतीचें ( नाणें ). गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी । - दा १० . ८ . १४ . ( त्यावरून ) खोटा ; बनावट ; लबाडीचा . २ ( ल . ) बेशिस्त ; अनभ्यासी ; गांवढळ ; अडाणी ( माणूस ); अयोग्य ; अनुचित ( वर्तन ). ३ अशिष्ट ; अडाणी ; हलका ; राकट ; बेडौल ; गांवठी इ
००सोई   सोय - स्त्री . अडचण ; त्रास ; हाल ; अप्रशस्तता .
०सोईचा वि.  अडचणीचा ; सोईचा , सुखकर नसलेला .
०हंगाम  पु. गैरमोसम पहा . त्यास गैरहंगाम , हल्ली खरबुजीं तयार मिळालीं ते आठ सेवेसीं पाठविलीं असेत . - रा ३ . ३१२ . हजीर , हाजीर - वि . मोजदादीच्या वेळीं समक्ष नसलेला ; अविद्यमान ; अनुपस्थित . [ फा . ]
०हिसाबी   हिशेबी - स्त्री . अन्याय ; अव्यवस्थितपणा . - क्रिवि . अन्यायानें . आपले जागिरींत नाहक गैरहिसाबी पादशाह खलल करविताती । - इमं ६७ .
०हुकुमी वि.  अनधिकृत ; संमति , अज्ञा नसलेलें ; नामंजूर .
०हुर्मत  स्त्री. अप्रतिष्ठा ; बेअब्रू .

गैर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
गैर  mfn. mfn. (fr.3.गिरि॑) coming from or growing on mountains, [W.]

गैर     

गैर [gaira] a.  a. (-री f.) [गिरौ भवः अण्] Coming from a mountain, mountain born.

गैर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
गैर  mfn.  (-रः-री-रं) Mountain, mountaineer, mountain-born.
E. गिरि, and अण् aff.
ROOTS:
गिरि अण्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP