|
पु. १ पादकंदुक क्रीडेमध्यें डाव होण्याकरितां हद्दीवरील दोन खांबांमधील ज्या रेषेंतून चेंडू दवडाचा लागतो ती रेषा . ( क्रि० करणें . ); डाव . २ ध्येय . [ इं . गोल ] पु. १ गोलक ; वर्तुळाकार , वाटोळी , वर्तुळस्तंभाकार , वरवंटयासारखी वस्तु ; ज्या भरीवाच्या पृष्ठावरील बिंदु मध्यबिंदूपासून समान अंतरावर असतात तो ; गोळा . २ मंडळ ; वर्तुळ ; परिधिवृत्ताकार आयत . ३ कृत्रिम गोल ; वर्तुळ ; खगोल , भूगोल , दृग्गोल पहा . ४ गोलदार दांडा , वांसा ; चरकावर केलेला गोलदार दांडा . ५ वर्तुळपणा ; वर्तुलत्व ; लंबवर्तुलत्व . ६ ( चेंडू दांडू खेळ ) लाकडी चेंडू . ७ नक्षीदार कांठ , पदर ( पागोटयाचा ). ८ घोळ ; थवा ; जमाव ; कळप ; झुंड . ९ सैन्याची एक रचना . चौफेर बांधुनी गोल । - संग्राम ६० . १० लोंढा ; झोल ; डोंब ( आगीचा ). ११ राशीचक्रमंडलाचा एक भाग किंवा अर्ध . वृषभराशीचा ग्रह उत्तरगोलांत जाणावा . १२ फुलांचा गुच्छ , झुबका , गोटा . तुरा पहा . १३ नदींतील एक मासा . १४ गोफ , करगोटा यांच्या पदराची एक तार ( सोनें , चांदीची ). १५ ( विणकाम ) वशारन्याच्या सांधीच्या सांधीच्या कैचींत घालण्याच्या उपयोगी . सागवानी २॥ - ३ हात लांबीची वाटोळी काठी . १६ गोळा , तोफेचा गोळा . - वि . वाटोळा ; वर्तुळाकार ; लंबवर्तुळागार ; वर्तुलस्तंभाकार . [ सं . ] सामाशब्द - ०कल्प ज्या गोलाच्या समोरासमोरच्या दोन बाजू चपटया किंवा फुगलेल्या असतात तो . ०चवडशी स्त्री. ( कासार ) भांडें घडवितांना ठोकठोकून , कमजास्त जाड असेल तेथें सारखें करण्याचा चौरस हातोडा . ०ची स्त्री. १ गोलाकार . २ ( सुतारी ) खांब वगैरे चौरस लाकडांच्या कोपर्यास गोलाकार देण्याचें हत्यार ; याला ( कु . ) गोलची रोखणहि म्हणतात . ( क्रि० मारणें ). ४ ( चांभारी ) रेघा मारण्याचें हत्यार . ०टा पु. ( इमारत काम ) जाड , गोल पण आंखूड वांसा ; जाड बुडखा असलेला वांसा . ०थरे वि. ( गो . ) सैल . ०दडा दाड दाडा दोडा - पु . एक मोठा सरळ सोट वृक्ष ; याचें फळ भाजून खातात व हें औषधी आहे . गोलंदाज - पु . तोफ डागणारा ; तोफची गोळा फेकणारा . [ फा . गोलंदाझ . सं . गोल ] गोलंदाजी - स्त्री . तोफ डागण्याचें काम ; तोफांची सरबत्ती . [ सं . गोल + फा . दाजी ] गोलदानी - स्त्री . बंदुकवाल्याच्या कमरेस बांधलेलें गोळया ठेवण्याचें शिंग . [ सं . गोल + फा . दानी ] ०दार वि. १ वर्तुळाकार ; वाटोळें . २ आंकडेदार ( मिशा ). ३ मांसल ; भरदार ( हात , मांडी ). ४ नक्षीदार पदराचें ( पागोटें ). ०परिघ पु. महावृत्ताचा घेर , मर्यादारेषा . - सूर्य १० . ०बाह्य वि. ( शाप . ) गोलाच्या पृष्ठभागाप्रमाणें बाहेरील अंगानें गोल . ( इं . ) कॉनव्हेक्स . ०मापकयंत्र न. ( शाप . ) कोणत्याहि गोलाची किंवा त्याच्या तुकडयाची त्रिज्या आणि एखाद्या पदर्थाची जाडी काढण्याचें यंत्र . ( इं . ). स्फेरोमिटर . ०मिंद ( कों . ) मासे पकडण्याचें एक जाळें . ०सर वि. थोडें गोलाकार , गोल . गोलाची लंब संस्था - स्त्री . विषुववृतावरून आढळणारी स्थिति ; या ठिकाणीं विषुववृत्त व त्याच्याशीं समांतर जीं वृत्तें आहेत तीं क्षितिजावर लंब होतात . - मराठी ६ वें पुस्तक पृ . ३१६ . ( १८७५ ). गोलाची , वक्रसंस्था - स्त्री . जेव्हां एक ध्रुव क्षितिजाच्यावर आहे आणि एक क्षितिज्याच्या खालीं आहे तेव्हां विषुववृत्त व त्याच्याशीं समांतर दुसरीं वृत्तें यांचें क्षितिजाशीं पडणारे वक्रकोन . मराठी पुस्तक ६ वें पृ . ३१६ . ( १८७५ ). गोलांट , गोलांठ , गोल्हांट , गोलांटी - नस्त्री , खालीं डोकें वर पाय करून मारलेली उलटी उडी ; कोल्हाटी . ( क्रि० घेणें , मारणें ). गोलांतर - वि . आंतून गोल ; गगनाकृति ; पोकळ गोलाच्या आंतील भागाप्रमाणें असलेलें . ( इं . ) कॉनकेव्ह . गोलाध्याय - पु . गोलासंबंधीं विवरण करणारा गणितशास्त्राचा भाग . भास्कराचार्यांच्या सिध्दांतशिरोमणीचा हा एक भाग आहे . गोलार्ध - पु . गोलाचा अर्धा भाग . उ० पूर्व - पश्चिम गोलार्ध . [ सं . गोल ]
|