|
वि. १ कुटुंबांतील ; घरांतील ( माणूस ); घरांत जन्मलेला , वाढलेला , तयार केलेला इ० . घरचा उठला चोर गेला . २ ( ल . ) नवरा ; पति . आम्हांस आतां फार रात्र झाली , घरचीं रागें भरतील . - रत्न ५ . ४ . ३ स्वत :- सिध्द ; स्वसंपन्न ; दुसर्याची अपेक्षा न लागणारा . उ० घरचा गाणार , सुतार , विद्वान इ० ४ ( सामा . ० घरगुती पहा . ( वाप्र . ) ०कारागीर कसबी - पु . घर शब्दामध्यें घरकसबी पहा . ०दाणा पु. घरीं उत्पन्न केलेलें , घरच्या शेतांतलें धान्य ; स्वत : चा धान्याचा सांठा , बेगमी ; याचप्रमाणें घरची विद्या शिकलेला ; नेहमींच्या , किरकोळ कामांत , बाबींत त्या त्या कामांतील तज्ज्ञांचें साहाय्य ज्यास घ्यावें लागत नाहीं असा ; ०सुखी वि. खाऊन पिऊन सुखी ; सुखवस्तु ; निर्वाहाकरितां धंदा , नोकरी ज्यास करावी लागत नाहीं असा . - ची उतरंड , ची कूड - स्त्री . ( ना . ) दुसर्याला निरुत्तर करण्याच्या अथवा त्याची फजिती करण्याच्या हेतूनें वापरण्यांत येणारा हलकट शब्दप्रयोग . - ची विद्या - स्त्री . कुटुंबांत चालत आलेली विद्या , धंद्याचें ज्ञान ; घरीं शिकतां येण्यासारखी विद्या . - ची सोबत - स्त्री . कुटुंबांतील माणसाची , नातलगाची , ओळखीच्या , सलगीच्या माणसाची सोबत , संगत ( प्रवास वगैरेसाठीं ). - चें द्रघ्य - न . कुटुंबांतील द्रव्याचा निधि ; खासगी , स्वत : चें द्रव्य . घरचा ना घाटचा - वि . कोण , कुठला , कोणाचा , काय उपयोगाचा इ० ज्यासंबंधीं कांहींहि सांगतां येत नाहीं असा ( मनुष्य , पदार्थ , प्राणी ); अगदीं अनोळखी ; परकी .
|