Dictionaries | References घ घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी Script: Devanagari Meaning Related Words घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (संन्यासी) बाहेर अनेक दिवस राहून बायकोस भेटावयास म्हणून घरी येऊन जो पाहतो तो बायको विटाळशी बसलेली. यामुळे त्याच्या उत्कठेचा विरस होऊन मन खट्ट होते. एखाद्या मनुष्याने मोठ्या आशेने, एखादी गोष्ट मिळेल या अपेक्षेने यावे व तो तेथे निराशा व्हावी. या म्हणीत संन्याशी शब्द योग्य नाही. कारण संन्याशास बाको नसते हा सामान्य नियम आहे व असली तरी त्यास तिची भेट घेता येत नाही. तेव्हां बहुधा परदेशी म्हणजे नेहमी व्यापार धंद्यानिमित्त बाहेर राहणारा मनुष्य, परागंदा झालेला इसम वगैरे उद्दिष्ट असावा. किंवा पाहुणा म्हणून संन्याशाला पुडीला बोलवावे तो घरी बायको विळाटशी असल्यामुळे स्वयंपाकाची अडचण व्हावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP