|
पु. १ देश एकमेकांपासून भिन्न करणारी पर्वताची रांग ; दोन देशांच्या सरहद्दीवरील पर्वतांची रांग . २ ( विशेष अर्थानें ) सह्याद्रीची रांग . ३ डोंगर ओलांडून जावयाचा रस्ता ; डोंगरावरील वाट ; खिंडीतील रस्ता . उ० खंडाळयाचा घाट ; कात्रजचा घाट ; डोंगरावरील अडचणीची व बिकट वाट . उ० रड तोंडीचा घाट . तेहवेळीं कुचपर्वताचां घाटीं । ओळघतां डोळे जाले आयेतुटीं । - शिशु ५६० . लष्कर चाल पेणोपेणीं घाटा हाडत उतरले । - ऐपो ८१ . ४ नदी , तलाव इ० कांच्या कांठावर नावेतून उतरण्या करितां , नावेंत बसण्याकरितां बांधलेला धक्का ; नदीकांठीं बांधलेला दगडी बांधणी ( विशेषत : पायर्यांची ). नदीवरील पायर्या . य० ब्राह्मणघाट ; धोबीघाट ज्या नांव तीर्थ वरि घाटहिरम्य आहे । - नरहरि गंगारत्नमाला १५९ ( नवनीत पृ . ४३३ ). ६ धरण ; बंधारा ; धक्का . आणि सुटलिया सिंधु जलाचा लोटु । न शके धरुं सैंधवाचा घाटु । - ज्ञा ९ . १२४ . ७ सह्याद्रीच्या रांगेच्या पूर्वेकडील देश , प्रदेश ; सह्याद्रीचें पठार ( ज्यास कोंकणसापेक्ष देश हें नांव आहे ). आम्ही घांटावरचीं माणसें आहोंत . - कोरकि ४८३ . सालमजकुरीं घाट चांगला पिकला . [ सं . घट्ट = घाट ; तुल० का . गट्ट , घट्ट , घाट ; हिं . सिं . घाटी = डोंगरांतील रस्ता ; बं . घट्ट , घाइट ] ( वाप्र . ) घाटांत अडवणें , घाटांत धरणें , घाटांत मारणें - ( चोर , लुटारू , डोंगरांतील घाटांत किंवा अडचणीच्या मार्गीत वाटसरूंना गांठून त्यांना लुबाडतात त्यावरून ल . ) एखाद्याच्या अडचणीचा फायदा घेणें ; एखाद्याला अडचणीच्या वेळीं अडवून धरणें . स्त्री. १ घाटलेले हरभरे , डाळ . २ ( मिठाई , मिष्टान्न इ० करितां ) शिजविलेलें पीठ . ३ हरभर्यावर पडणारा तांबरा , गोरवा , एक रोग . ( यानें हरभर्याचा घाटा भरत नाहीं ). ( क्रि० पडणें ). ४ अटघाट ; आटघाट पहा . ( घाटणें ). पु. १ ( भांडी , दागिने इ० कांचा ) आकार ; घडया ; डौल ; ढच ; ठेवण ; रचना . अति तरल विलोकी घाट ते मेखळांचे । - सारुह ३ . ३८ . चेहेरा घाटानें लांबट होता . - कोरकि २२ . २ ( ल . ) ( बेत , मसलत , हातीं घेतलेलें काम इ० कांचें ) बाह्य स्वरूप ; रागरंग ; रंगरूप . या मसलतीचा घाट कसा दिसतो ? ३ ( हेतु , योजना इ० कांचा ) आविर्भाव ; अवडंबर ; उठाव ; आव . यास्तव त्यानें स्वयंवराचा घाट तिच्या घातला . - विक ३१ ४ योजना ; बनाव ; बेत . हा घाट जमून आला तर काय बहार होईल ! - अस्तंभा ८९ . ५ विशिष्ट घडण ; आकृति ; बैठक ; साज . लावले समयांचे थाट । केले उदबत्यांचे घाट । - मसाप २ . १ . २३ . [ सं . घट = रचणें , करणें ; म . घडणें ; गु . घाट ; सिं . घाटु ] ( वाप्र . ) पु. ( कों . नाविक ) झाडी व गलबताच्या बाजूच्या फळया जोडणारा खिळा . मालवण , गोमांतकाकडे कबिला किंवा खिळे या ऐवजीं सुंभाचे दोर लावून कळया जोडतात . स्त्री. १ घसा ; घशाचा बाहेरील भाग ; घांटी ; कंठ , कंठमणि . गेलें घांटीं झालें माती . २ गळा ; कंठ ; आवाज . [ सं . घाट ] ( वाप्र . ) घांटीं फुटणें - १ ( मुलाच्या ) आवाजांतील कोमलता जाऊन तो मोठा , प्रौढ होणें ; हें ( मुलगा ) वयांत येण्याचें लक्षण आहे . घांटीं फुटला = बदसूर झाला . २ ( गाणार्याचा ) आवाज घोगरा होणें ; स्वरभेद होणें ; स्वर बिघडणें ; आवाज चिरकणें , बसणें ; घांटीं शेंदूर ओतणें - ( पेय , खाद्यपदार्थांत मिसळून ) शेंदूर गिळावयाला , खायला लावणें ; प्रतिपक्षीय गवयाचा कंठ बिघडविण्याकरितां ही युक्ति करतात . सामाशब्द - ०कावला पु. घाट कावला खुशकीवर घाटी ऐन जिनस वगैरे येईल किंवा जाईल ... त्यास दरबैलीं घ्यावयाचा शिरस्ता रुपये ... - मसाप २ . २ . १८४ . [ घाट + कौल ] ०घालणें बेत योजणें , करणें . सामाशब्द - ०कोर स्त्री. गळयाचा भाग ; नरडी . असें कुभांड करून दांड होऊन भांड धरिसी घाटकोर । - होला ३७ . [ घाट + कोर = कड , बाजू ] ०काम न. १ ( बांधकाम ) कोनाडे , कमानी यांवर केलेलें नकशी काम . २ ( सोनारकाम ) सरी , वांकीं वगैरे हातांनीं करण्याचें व त्यांस आकार देण्याचें काम . ०नाळ स्त्री. डोंगराच्या घाटावरील जकात वसूल करणारा अधिकारी ; घाटाच्या तोंडाशीं जकात घेणारा अधिकारी ; जकातदार ; - थोमारो २ . २३८ . [ घाट + पांडया = कारकून ] ०रोग पु. गुरांना घशांत होणारा एक रोग . [ घांट + रोग ] ०घडाव वि. कमजास्त . [ घाट + घडणें ] ०सर्प पु. घशांत होणारा एक रोग ; घटसर्प . हा कफदोषामुळें होतो , ह्यानें गळयांत लांबट व जाड अशी सूज उत्पन्न होऊन अन्नमार्ग बंद होतो . इं . डिफ्थोरिया . ०पाय पाया - पु . घाटाचा पायथा . घाटपायापासून घाटमाथा कोसभर उंच आहे . [ घाट + पाय ] ०शुध्द वि. सुंदर ; सुबक घाटाचा , घडणीचा . ०बंदी स्त्री. १ ( डोंगरांतील ) घाटांतून कोणी रहदारी करूं नये म्हणून केलेला बंदोबस्त . २ ( नदीचा , डोंगराचा ) घाट बांधण्याकरितां झालेला खर्च वसूल करण्यासाठीं बसविलेला कर , पट्टी . [ घाट + बंदी = बंदोबस्त , मनाई ] ०सूद वि. ( अशिष्ट ) घाटशुध्द पहा . [ घाट + शुध्द ] ०बुडी स्त्री. ( राजा . ) घाटाचा पायथा ; घाटपाया . [ घाट + बूड ] ०माथा पु. १ डोंगराचा माथा ; डोंगरावरील सर्वात उंच भाग ; पठार . २ ( डोंगरांतील ) खिंडीतून जाणारा अरुंद रस्ता ; घाटांतील सर्वात उंच भाग . [ घाट + माथा ] ०रखवाली पु. घाटावरील रखवालदार , पहारेकरी . ०वळ वळी - वि . घाटावरचा ; सह्याद्रीच्या पूर्वेकडील मुलुखांतील ; देशावरचा ( मनुष्य ). हा शब्द विशेषत : घाटावरील प्राणी व पदार्थ यांचा वाचक आहे . ०सर सरी - स्त्री . पर्वताच्या , रांगेच्या उतरणीचा अगदीं वरचा प्रदेश ; घाटमाथ्याच्या आजूबाजोचा प्रदेश ; घाटमाथा . घाटसरीचे किल्ले प्राय : पाडले . घाटोघाट - क्रिवि . निरनिराळया घाटांतून . लगडझगड जळखडें घाटोघाट । - ऐपो २४२ . [ घाट द्वि . ]
|