Dictionaries | References

घोळाणा

   
Script: Devanagari
See also:  घोलाणा , घोळाना

घोळाणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghōḷāṇā m The fleshy root of the septum of the nose. घो0 फुटणें To have epistaxis or bleeding at the nose.
Disorder, confusion &c. This word occurs in the second, third, and fourth senses of घोळ, but it is far less common. 2 The green leaf of Cicer arietinum and other plants rolled up upon the palm of the hand with salt &c.

घोळाणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : घोळणा

घोळाणा     

 पु. ( क्क . ) गोंधळ ; गुंतागुंत ; घोंटाळा . घोळ अर्थ ३ , ४ , ५ . पहा .
 पु. 
  1. हरभर्‍याचा हुळा ; ज्वारीचा हुरडा इ० जो हातावर चोळून मीठ घालून खातात तो . हुरडा ओंब्या घोळाणा । तिळगुळेंसि चाखविलें सुजाणा । - एभा . ३१ . ४०१.
  2. ( व . ना . ) कडू निंबाचीं कोवळीं पानें , चिंच , बिबे इ० कांचें मिश्रण करून त्याला फोडणी देऊन तयार केलेला पदार्थ . हा आर्द्रा नक्षत्राच्या सुरवातीस - बदलत्या ऋतुमानाचा शरीरावर होणारा परिणाम टाळण्यासाठीं - खातात . [ घोळणें ? ]

 पु. घोळणा पहा .
 पु. ( व . ) कच्ची पालेभाजी कुसकरून तिखट , मीठ , तेल वगैरे घालून केलेला खाद्यपदार्थ ; घोळणा . [ घोळणें ]
 पु. नाकपुडयांमधील पडद्याचा मांसल भाग ; गुणगुणा ; घोळणा ; घोणा पहा . [ सं . घोणा = नाक ]
०फुटणें   नाकांतून ( उन्हामुळें , उष्णतेमुळें ) रक्त वाहूं लागणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP