Dictionaries | References

चढविणें

   
Script: Devanagari
See also:  चढवणें

चढविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. तंबाखूची गोळी चढवावी आणि गायास बसावें. 5 To instigate, incite, stir up. चढवून येणें To get up; to fly into a passion.

चढविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To make to ascend, mount, climb: also to make to rise, advance, increase, swell &c. To apply or lay on (a slap, lash, stroke). To instigate, incite, stir up.

चढविणें     

अ.क्रि.  १ वर जाण्यास , बसण्यास , आरूढ होण्यास लावणें , करविणें ; वर बसविणे . २ उठविणें ; वाढविणें ; जास्ती करणें ; सुजविणें ; फुगविणें . घनी ( साव्हरिनचा ) भाव चढविण्यास कबूल आहे . - गुजा ३५ . ३ ताणणें ; आकर्षणें ; लावणे ( धनुष्यास गुण ). सारंगधनुका चढाउनु गुणु । - उषा १६५३ . ४ मारणें ; लगावणें ; तडकाविणें ( चापट , तडाखा , रपाटा ). दोन तोंडावर चढविल्या आणि कबूल झाला . ५ तोंडांत घालणें ; पिणें ( तंबाखू , भांग इ० ). तंबाखूची गोळी चढवावी आणि गावयास बसावें . ६ ईर्ष्येस लावणें ; चेतविणें ; खाजविणें ; भर देणे ; तयार करणें ; उद्युक्त करणें ; कपटानें स्तुति करणें . समर्थें येकदां कौतुके नीच यातीस चढविलें । - सप्र ३ . ७६ . ७ अंगांत घालणें ( पोषाख ). योग्य तो पोषाख चढवावा . - ऐरा २ . ४८ . [ म . चढणें प्रयोजक ; हिं . चढवाना ] चढवून येणें - १ ( भाग , दारू , इ० ) पिऊन येणें . २ रागावणें ; एकदम संतापणें ; कैफ आल्याप्रमाणें वागणें , बोलणें .

चढविणें     

चढवून येणें
१. नशापाणी करून येणें
अमल करून येणें. २. रागावणें
संतप्त होणें
अतिशय क्रोधाविष्‍ट होऊन बोलणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP