Dictionaries | References

चहुं

   
Script: Devanagari
See also:  चहु , चहूं

चहुं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cahuṃ a Four. Only in comp. Examples in order.

चहुं     

वि.  १ चार ; चौ यांचें समासांत योजावयाचें रूप . २ ( सांके . ) चार वेद . सा चहूं वेगळा अठरा निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे । - तुगा २४६ . [ सं . चतुस , चौ ] ( वाप्र . ) चहूं पायांनीं , दोहों पायांनीं उतरणें - शिंगरूं , वासरूं , पाडा वगैरेनीं चार पाय किंवा दोन पाय पुढें करून जन्मणें . सामाशब्द -
०कडला   कडील - वि . सभोंवतालच्या दिशांकडील ; सर्व बाजूंचा ; सार्वत्रिक .
०कडून   क्रिवि . सर्व प्रदेशाकडून ; सर्व बाजूंकडून ; जिकडूनतिकडून . स्वगजांसहि भीतो गज मारित येतां चहूंकडुन चवघे । - मोभीष्म ५ . ५३ .
०कडे   दिशांस फेर फेरी - क्रिवि . चोहींकडे ; सभोंवार ; जिकडेतिकडे ; सर्व बाजूंना . सदा भय वाटे चहूंकडे । तरी देवक्षोम जाणिजे । - ह ६ . २०९ .
०कोण   क्रिवि . चोहीकडून .
०देह  पु. स्थूल , सूक्ष्म , कारण , महाकारण हे चार देह . चहू देहांची अहंकृती । स्वप्नीही न धरिती . हरिभक्त । - एभा २ . ७१० .
०रंगी वि.  बहुरंगी ; बेढंगी . चोरटा चहुरंगी बलचंड । - आम २६ .
०वाचा   वाणी - स्त्री . परा , पश्यंती , मध्यमा आणि वैखरी या चार वाचा . ते अनिर्वाच्या निजगोडी । चहूंवाचांमाजीं वाढी । - एभा १ . २१ . - एभा ३ . २८९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP