Dictionaries | References च चांभारचाळवणी Script: Devanagari Meaning Related Words चांभारचाळवणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांभारास नवीन जोडा करावयास सांगितला, किंवा एखादा दुरूस्त करावयास दिला असतां तो सांगितल्या वेळेवर कधीहि तयार करीत नाही व उद्यां या, चार दिवसांनी या, अशाप्रकारे नेहमी वायदे करून चाळवण्या दाखवीत असतोयावरून. टोलवाटोलवदिरंगाईप्रत्येक गोष्ट पुढे ढकलणेंवायदे करणें. विशेषतः पूर्वी जेव्हां चांभार बलुतेदार म्हणून वर्षाकांठी मोसमात धान्य घेऊन पावसाळ्या आरंभी सर्वांस जुती पुरवीत असे, त्यावेळी एकाच वेळी सर्वांस पायतणें पुरविणें त्यास अशक्य होत असल्यामुळे त्यास नेहमी वायदे करून वेळ मारून न्यावी लागत असावी. अलीकडे पुष्कळसे कपडे शिवणारेहि असे वायदे करीत असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP