Dictionaries | References

चाखणें

   
Script: Devanagari

चाखणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

चाखणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Taste.
चाखतमाखत जेवणें   Eat delicately.
चाखून रांधणें   To cook after tasting. To be uncertain about the result.

चाखणें     

उ.क्रि.  गोडी समजण्यासाठीं खाऊन पाहणें ; चव घेणे ; रुचि , आस्वाद घेणें ; लक्षणेनेंहि हा शब्द पुष्कळ वेळां योजतात . [ सं . चष ; प्रा . चक्खण ; हिं . चाखना ] ( वाप्र . ) चाखतमाखत जेवणें - अडखळत , थांबत थांबत बोलणें . चाखून रांधणें - अगोदर चाखून किंवा रुचि पाहून अथवा किंचित खाऊन पाहून मग शिजविणें ( स्वयंपाक्याला पदार्थ चांगला झाला किंवा नाहीं हें चाखल्याशिवाय समजत नाहीं . म्हणून या वाक्प्रचाराचा उपयोग निषेधार्थी व शेवटाविषयीं , परिणामाविषयीं अनिश्चित किंवा संशयित असणें या अर्थी करतात ). चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं - कोणालाही आपल्या हातून चूक व्हावयाची नाहीं अशी खात्री बाळगतां येत नाहीं . म्ह० १ तळें राखील तो पाणी चाखील . २ चाखलें नाहीं पण देखले तर असेल .

चाखणें     

चाखत माखत जेवणें
चव घेत घेत, चिकित्‍सा करीत भूक नसतांना नाकाओठावर जेवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP