|
वि. १ ४ ; चार ही संख्या . २ एक परिमित संख्या दर्शविणारें . त्याला चार गोष्टी समजावून सांग . त्याचेजवळ चार पैसे आहेत . ३ चवथ्या प्रतीची , ( वसुलीच्या कागदांत वापरतात . ) [ सं . चतुर ; फा . चाहरम , च्यारम ; फ्रें . जिप्सी स्तर ; आर्मेनि . त्सतर ; झें . तेस्सारेस्स ] सामाशब्द - पु. १ एक वृक्ष , याचीं पानें मोहाच्या पानांसारखीं मोठी व लांबट असतात . हीं झाडें महाबळेश्वर , गंगातीर , गुजराथ या भागांत असून याच्या पानांच्या पत्रावळी करतात . २ - न . ( राजा . ) या वृक्षाचीं फळें . चारांच्या पक्व फळांचा रंग जांभळा असतो . पु. चाड पहा . आतां मोटी वार । माझी नका धरूं चार । - तुगा १४५ . पु. फणसाचे गर्याभोंवती जे बारीक तंत्वाकार अवयव असतात ते प्रत्येकी ; पातीं . पु. चार झाडाच्या बिया . चारोळया . ह्या मिठाईत व पक्वान्नांत घालतात . स्त्री. गुरें चारण्याची जागा . ' कोट अलीकडे चार आहे तेथपर्यंत मावळे लोकक वगैरे बरखंदाज गेले .' - पेद ३ . ३८ . ( चरणें ) स्त्री. १ हिरवें गवत ; नुकतेंच उगवलेलें हिरवें गार गवत . २ गुरांनीं खाण्याजोगा हिरवा पदार्थ ( झाडपाला , हरळी वगैरे ). पु. एक हलक्या जातीचें बोर ; ज्यांत मगज नसून केवळ सालपठ व बीं असणारें बारीक जातीचें बोर . याच्या झाडास चाराचें झाड असें म्हणतात . पु. १ हेर ; गुप्त दूत ; टेहळणी करणारे जासूद . राजा प्रमाणें जरी आम्हाला चार किंवा डिटेक्टिव्ह ठेवतां आले नाहींत तरी एवढें खूप समजा कीं परमेश्वर सर्वांत मोठा डिटेक्टिव्ह आहे . - टिव्या . २ दूत ; निरोप्या ; सेवक . चार प्रेरिले असंख्यात - मुविराट ४ . १० . [ सं . चर , चार ] क्रि.वि. प्रकर्षद्योतक म्हणून हिरवा या शब्दापुढें अत्यंत हिरवागार चा अर्थी योजितात . या पागोटयाचा रंग हिरवाचार आहे . ०आभिमानी पुअव . विश्व , तैजस , प्राज्ञ , प्रत्यगात्मा हे शरीरांतील चार अवस्थांचें अभिमानी . ०कूट न. ( को . ) नुकतेंच उगवलेलें कोवळें गवत . ०चक्षु न. राजांचे हेररूपी डोळे . राजास चार चक्षु असावे . - वि हेर हेच ज्याचे डोळे आहेत असा ( राजा , सेनानी ). राजा चारचक्षु असतो . - चंद्र १०४ . ०खंड न. १ फणसाचा तुकडा किंवा अलग केलेला भाग . २ ज्यांतील गरे काढून घेतले आहेत असा फणसाचा भाग ; २ ज्यांतील गर काढून घेतले आहेत असा फणसाचा भाग ; चारीसकट किंवा सागूळीसकट जो फणसाचा भाग तो . ३ वरील काटे अगर आवरण काढल्यानंतर अगर गरे काढल्यानंतर फणसाची सागूळ राहते ती . ४ गर काढलेला फणस . ( या चार अर्थापैकीं कांहीं अर्थ कोंकणांतील एका भागांत प्रचलित आहेत , कांहीं दुसर्यांत प्रचलित आहेत . दुसरा अर्थ बहुधा सार्वत्रिक आहे . ) ०अवस्था स्त्रीअव . जागृति , स्वप्न , सुषुप्ति आणि तूर्या या चार अवस्था . ०अक्षरें न. अव . थोडीशी विद्या ; विद्येचें एक परिमाण , माप . ज्यास चार अक्षरें येतात त्यासच ठेवावें . त्याला चार अक्षरें आलीं कीं देतों कोठें तरी नोकरींत अडकवून [ चतुर + अक्षर ] ०आणी स्त्री. ( व . ) पावली ; चार आण्याचें नाणें . ०आत्मे पुअव . जीवात्मा , शिवात्मा , परमात्मा व निर्मलात्मा . ०आत्मे पुअव . जीवात्मा , शिवात्मा , परमात्मा व निर्मलात्मा . ०काणे काने कान्हे - पु . अव . तिफाशीं खेळांतले एक विशिष्ट दान . चार पगडे . ०खण पु. निवार्याची जागा ; रहावयाची एखादी लहानशी खोली . ०खणी स्त्री. एक प्रकारचें कापड . - देहु १५० . ०खाणी स्त्रीअव . प्राणिवर्गांतील व वनस्पतिवर्गांतील सृष्ट पदार्थाचे अगर वस्तूंचे कल्पिलेले चार वर्ग - अंडज ; जारज ; स्वेदज ; उदभिज्ज . चारी पुरुषार्थ चहुं लक्षणी । मुक्तीची मांडणी चतुर्धा । - एभा ३ . ७७ . चत्वार . भूतग्राम पहा . ०खुट खुंट - क्रिवि . चोहोंकडे ; सर्वत्र . अक्कल कोटचे थेट राहणार चार खुट फिरलों शाही । - पला ४ . १३ . ०खुंट जहागीर स्त्री. पूर्व , पश्चिम , दक्षिण व उत्तर या चार दिशांकडे भिक्षेकर्याच्या झोळीचे कोंपरे असतात , झोळीचा विस्तार हाच जहागिरीचा प्रदेश . यावरून लक्षणेनें भिक्षेकर्याची वृत्ति ; दरिद्री स्थिति . चार खुंटाची जहागिरी असल्यावर कुणाची पर्वा राहील . ०गोमी वि. ज्याच्या किनारीमध्यें रेशमी चार गोमी असतात असे . ९ लुगडें ). गोष्टी लावणें , करणें - वेडेवांकडे आक्षेप काढणें . गोष्टी सांगणें - मन वळविण्याजोगें , समजून पटण्यासारखें भाषण करणें . ०घेणें चार देणें - शेजारधर्मानें देणें , घेणें करणें . चौघे - पुअव . दोन माणसें ( एकाच कामांत गुंतलेलीं ). तुमचे आणि माझे असे चार डोळे झाले म्हणजे चुकी होण्याचा संभव कमी . ०दाणे पुअव . तिफाशी डावांतील एक विशिष्ट दान ; चार काणे . ०दिवस पुअव . थोडे दिवस ; सुनेचे . ०दिशा स्त्रीअव . पूर्व , पश्चिम , दक्षिण , उत्तर या दिशा . चार दिशा मोकळया होणें - वाटेल तिकडे जाण्याला जग सगळें मोकळें असणें . ०दोष पुअव . आत्माश्रयता , अनोन्याश्रयता , चक्रकापत्ति व अनवस्था हे चार दोष विकल्प विषयीं शास्त्रांत सांगितले आहेत . ०धामें नअव . हिंदुस्थानांत उत्तरेस केदारेश्वर . दक्षिणेस रामेश्वर ( हीं शिवधामें ), पूर्वेस जगन्नाथ व पश्चिमेस द्वारका ( ही दोन विष्णुधामें ), हीं देवस्थानें . [ चतुर + धाम ] चारंपंजम - वि . चवथ्या व पांचव्या प्रतीचें , हलक्या दर्जाचें रेशीम . [ फा . चाहरम + पंजम = चार व पांच ] ०पायी स्त्री. खाट ; पलंग . [ सं . चतुर + पद ; हिं . चारपाई ] ०पुरुषार्थ पु. धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ . बैली - वि . जिला बैलांच्या दोन जोडया म्हणजे चार बैल लागतात अशी ( गाडी , मोट ). ०भक्त पुअव . आर्त , जिज्ञासु , अर्थी आणि ज्ञानी हे चार प्रकारचे भक्त ०मुक्ति चत्वारमुक्ति पहा . ०युगें नअव . कृत ( किवा सत्य ), त्रेता , द्वापार व कलि हीं चार युगें . ०लोक पु. अव . १ स्वर्ग , मृत्यु , पाताळ आणि कैलास . २ समाज ; समाजांतील माणसें ; चार स्नेही . ०वर्ण पुअव . चातुर्वर्ण्य पहा . ०वाटा स्त्रीअव . १ कोणतीहि बाहेरची वाट . २ ( ल . ) विस्तीर्ण जगांत हिंडण्याची परवानगी दहा वाटा किंवा बारा वाटा असेंहि म्हणतात . तुला चारी वाटा मोकळया आहेत , जा कसा ! ०वाणी चतुर्विध वाचा पहा . ०स्थानें नअव . नेत्र , कंठ , हृदय आणि मूर्घ्नि हीं स्थानें . ०हात होणें १ लठठाठ्ठी होणें ; हात घाईवर येणें . २ लग्न होऊन कर्तासवर्ता होणें . चारही ठाव - पुअव . भात , वरण , भाजी , पोळी हे जेवणांतील मुख्य मुख्य पदार्थ ; म्हणजे उत्तम प्रकारचें जेवण . याच्या उलट . घडयाळ टिपरूं = निवळ चटणीभाकरी .
|