Dictionaries | References

चालला तर गाडा, नाहींतर खोडा

   
Script: Devanagari

चालला तर गाडा, नाहींतर खोडा     

पायांनी चालावयाच्या ऐवजी आपण गाडीत बसून जाऊं लागलो असतां तो नीटपणें चालत असेल तर ठीक, नाहीतर एकदां का त्‍यांत काही बिघाड होऊन तो चालेनासा झाला, तर आपणास तो आणखीच अडचणीत पाडतो. कारण गाडा नीट झाल्‍याखेरीज तो आपणास तसाच टाकून जातां येत नाही. तेव्हां आपले काम बाजूस ठेवून आधी त्‍याची दुरूस्‍ती करण्याकडे लक्ष्य द्यावें लागते व त्‍यामुळे आपल्‍या कामाचा खोळंबा होतो. विशेषतः हल्‍लीच्या मोटारींच्या बाबतीत हा अनुभव नित्‍याचाच आहे. एखाद्यावेळी भलत्‍याच ठिकाणी खोळंबा होऊन थांबण्याची वेळ येते. कोणतीहि गोष्‍ट सुरळीतपणें चालली आहे तों ठीक असते, नाहीतर तिच्यापासून मदत मिळण्याऐवजी उलट अडथळा मात्र उत्‍पन्न होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP