Dictionaries | References च चौक Script: Devanagari Meaning Related Words चौक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आँगन, चौराहा, अल्पना, चौहट्टा चौक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun देवळाच्या माटवाचें मुखेल दार Ex. देवळाच्या चौकेर खूब गर्दी आशिल्ली ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चौकीWordnet:malക്ഷേത്ര് പ്രവേശന ദ്വാരം marमंदिराच्या मंडपाचे प्रवेशद्वार sanप्रद्वारम् noun जें चार खांब्याचेर स्थीत उरता अशी वास्तू रचणूके प्रमाण देवळाची चौकी वा मंटपाचो वयलो भाग वा तोंक Ex. चौकाची कलाकारी खूब सूंदर आसा ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)See : चावडी चौक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 7 ind The term used in multiplying by four any number above unity. Ex. तीन चौक बारा Four times three are twelve. सातव्या चौकांत बसणें To sit in the very innermost court or apartment. चौक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A square court. A stanza. The number 4 on a die.सातव्या चौकांत बसणें To sit in the innermost apartment. चौक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उघडी प्रशस्त जागा ( जाहीर सभा , बाजार वगैरेसाठी ), चवाटा . चौक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चार रस्ते येऊन मिळ्तात अशी जागा Ex. चौकात खूप गर्दी जमली होती ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चव्हाटा चवाठाWordnet:asmচাৰিআলি bdसारियालि benচার মাথা gujચોક hinचौराहा kanಕೂಡುರಸ್ತೆ kasژُ ووٚت kokचावडी malനാല്ക്കവല mniꯂꯝꯂꯣꯡ꯭ꯃꯔꯤ꯭ꯐꯥꯡꯕ oriଚାରିଛକ panਚੋਰਾਹਾ sanचतुष्पथः tamநாற்சந்தி telకూడలి urdچوراہا , چوک , چار مہانی noun पोवाड्यातील कडवे Ex. तिसर्या चौकात पुरंदराच्या स्वारीचे वर्णन आहे. noun चहूबाजूस बांधकाम केलेली व मधे रिकामी असलेली जागा Ex. वाड्याच्या मधल्या चौकात बरीच गर्दी जमली होती. noun लग्नादी समारंभात, पाटपासोड्यावर गहू, तांदूळ यांनी काढलेला चौकोन Ex. चौक भरून कुलस्वामिनीची स्थापना केली. noun चौसोपी वाड्यातील खुला, चौकोनी मध्यभाग Ex. मुले चौकात खेळत आहेत. HOLO COMPONENT OBJECT:घर ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচোতাল benআঙ্গিনা gujઆંગણું hinआँगन kanಅಂಗಳ kasآنٛگُن kokआंगण malപൂങ്കാവു് mniꯁꯨꯃꯥꯡ nepआँगन oriଅଗଣା panਵਿਹੜਾ sanप्रकोष्ठः tamமுற்றம் telతలవాకిలి urdآنگن चौक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ चौकोनी अंगण , जागा . २ ( घोडयाची ) चारी पाय उचलून भरधांव , डौलदार पळण्याची चाल ; चित्रें काढून चौक उजविले . । - ऐपो २११ . चारी पाय उचलून भरधांव डौलदार पळण्याची चाल . जरा घोडयावानी चौक टाक . - चंद्रग्र ९१ . ३ लावणींतील अंतरा ; पोवाडयांतील कडवें , एक भाग ; एक छंद . ४ फाशावरील चार ठिपक्यांची संख्या ; चारांचें दान . ५ चौसोपी वाडा ; घराचा , मंदिराचा चौकोनी मध्यभाग ; देवळांतील गाभार्याच्या समोरील सभामंडपांतील खांबांमधील चौकोनी जागा . ६ चवाठा ; चार रस्ते येऊन मिळतात अशी शहरांतील चौकोनी जागा . उ० मोतीचौक ; टिळकचौक ; शहरांतील मोठी पण मोकळी उघडी जागा ( या ठिकाणीं बाजार भरतो , चावडी असते ). ७ लग्नादि मंगल समारंभांत पाटपासोडयावर गहूं , तांदूळ यानीं काढलेला चौकोन . चौक भरियेला आसनीं । पाचारिली कुळस्वामिनी । - तुगा २८२ . ते मांडिली रत्नजडीत चौकी । मुक्ताफळांच्या बसलीत चौकी । - सारुह ६ . १७ . ८ रांगोळीचा एक प्रकार ; नानाविध रंगांनीं काढलेली वेलींची मालिका . सदैवीं जेथ अपुलां हातीं । चौक भरिले निगुती । - ऋ ७३ . ९ ( मनुष्याच्या ) कमरेवरचा पाठीचा भाग ; बगडा ; ( पशुंचें ) ढुंगण ; ढिमोरा . १० चौकोनी कापड ; रुमाल . मेणकापडाचे चौक . - प्रसूतिकृत्यादर्श ११ . ११ ( बे . ) चौकडा ; मुलांच्या कानांतील एक दागिना . १२ ( बे . ) शिमग्यांतील रात्रीचा जलसा . १३ ( सोनारी ) ठुशीचा एक भाग . १४ ( कु . ) चौकट . - अ . चोक ; कोणत्याहि संख्येची चौपट दर्शविणारा शब्द . उ० तीन चौक ( चोक ) बारा ; पांच चौक वीस इ० . [ सं . चतुष्क , प्रा . चउक्क ; हिं . चौक ; सिं . चौकु ] ( वाप्र . ) चौक भरणें - चौकपासोडा पहा . सातव्या चौकांत बसणें - अक्रि . १ ( घराच्या ) अतिशय आंतल्या भागांत , खोलींत . बसणें . २ ( ल . ) भेट , दर्शन अगदीं दुर्लभ होईल अशा प्रकारें राहणें . सामाशब्द - पु. ( आठ्यापाठ्या ) दोन पाठ्यांच्या अर्धाव भाग व सूर यांनीं मर्यादित भाग . - व्याज्ञा १ . २२० . पु. तलवारीच्या मुठीचा ठोला असतो त्या ठिकाणी होणारा चौकोनी भाग .- प्रश ५५ .०चाकर पु. सोंगटयांतील एक पारिभाषिक शब्द .०फेर पु. आट्यापाट्यांच्या खेळांत खेळणार्या गड्यांनीं एक अर्ध भागांतून दुसर्या अर्ध भागांत जाणें .' - व्याज्ञा १ . २४३ .०नहाण न. लग्नसमारंभांत विहिणीला , वराच्या आईला , मखरांत बसवून थाटानें घातलेलें स्नान . [ चौक + नहाण = स्नान ]०पासोडा पु. १ मंगलकार्यांत प्रथम रांगोळी घालून तीवर चौकोन काढून बटूस , वरास , वधूस , त्यांच्या आईबापांस बसण्याकरितां केलेलें आसन . चौक अर्थ ७ पहा . २ ( कर्हाड ) मुलींचा एक खेळ ; पासोडी पांघरलेल्या मुलीस आवाजावरून ओळखणें . [ चौक + पासोडा ] चौक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चौक भरणेंचौक पासोडा करणेंरांगोळी घालून वर पाट मांडतात व त्यावर शालजोडी इ. आंथरून वर गहूं.तांदूळ यांचा चौकोन काढतातअशा तर्हेचे आसन तयार करणें. ‘चौक भरियेला आसनीं। पाचरिली कुळस्वामिनी।’-तुगा २८२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP