Dictionaries | References

चौथ

   
Script: Devanagari

चौथ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चतुर्थी

चौथ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of the whole चौथ, and this was assigned to the पंतसचिव. The remainder, equal to sixty-nine per cent. of the चौथ, termed ऐनमो- कासा, was partitioned, on certain conditions, among the Sirdars. In some districts there was, besides the साहोत्रा a sum equal to three per cent. on the whole चौथ deducted from the मोकासा, and named नाडगौंडा. Very numerous subdivisions of the चौथ have since been made.

चौथ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The fourth lunar day. One-fourth of government-collections obtained by Marathas from other territories
चौथीचा चंद्र पाहणें   To be visited with some accusation or affliction.

चौथ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चतुर्थी

चौथ     

 स्त्री. १ चतुर्थी तिथि . २ ( कों . ) लोणी वगैरे तोलण्याचें अठ्ठेचाळीस दुदांडी शिवराई पैसेभार वजन . ३ चतुर्थींश ४ चौथाई ; मुसलमानांच्या अमलाखालील प्रांतांतून सरकारी वसुलाच्या एकचतुर्थांश खंडणी मराठे वसूल करीत असत ती . ही खंडणी वसूल केल्यावर मराठे तिची पुढील प्रमाणें वांटणी करीत - चौथाईचा चतुर्थांश राजा स्वत : करितां ठेवीत असे आणि ह्या हिश्शास राजबाबती असें म्हणत . बाकी राहिलेल्या रकमेपैकीं म्हणजे मोलाशापैकीं सर्व चौथाईच्या साहोत्र्या इतकी ( शे . ६ इतकी ) रक्कम पंतसचिवास देत असत . बाकी राहिलेला ( चौथाईचा एकुणसत्तर शंभरांश ) हिस्सा ज्याला ऐनमोकासा म्हणत त्याची विशिष्ट अटीवर सरदार - जहागीरदारांत वांटणी होत असे . यांनीं मराठयांस लढाईच्या वेळीं सैन्य पुरवावयाचें असे . कांहीं प्रांतांत सगळया चौथाईवर शेंकडा तीन इतकी रक्कम वजा घालीत असत . तिला नाडगौडा असें म्हणत . मराठयांचय अमलाखालीं ते प्रांत आल्यावरहि वरीलप्रमाणें चौथाई वसूल करून वर सांगितल्याप्रमाणें तिची वांटणी होत असे . दाव्यांतील ऐवजांतील ( रकमेंतील ) रुपयास चार आण्याइतकी साधारणत : ही रक्कम असे . ६ कामावर भाडोत्री लाविलेल्या नोकरांच्या पगाराच्या रकमेचा चतुर्थांश मुख्य अंमलदारास मिळत असे त्यासही चौथ म्हणत . ७ शिवाय कोर्टांतील बेलीफास प्रोसेस बद्दल दिलेल्या मजूरीचा चतुर्थांश नाझरास मिळत असे त्यासहि चौथ म्हणत . - वि . चतकोर ( भाकरी ). [ सं . चतुर्थ ; प्रा . चउत्थ ] ( वाप्र . ) चौथीचा चंद्र पहाणें , चौथीचा चांद पहाणें - कांहीं तरी आळ , किटाळ येणें ; चतुर्थांचा चंद्र पाहिला असतां चोरीचा आळ येतो असा समज आहे . चौथीचा चांद पाहिलांत याचा हा परिणाम बरें का ? - नामना ८६ .
०कर   कोर - पुस्त्री . ( प्र . ) चतकोर पहा .
०भरणी  स्त्री. १ भाद्रपद वद्यांत ज्या दिवशीं भरणी नक्षत्रीं चंद्र असतो असा ( तृतीयेचा , चतुर्थीचा , पंचमीचा दिवस . २ मागील बारामहिन्यांत मेलेल्या माणसांचें या दिवशीं केलेलें श्राध्द ; भरणी श्राध्द . [ चौथ = चतुर्थी + भरणी = भरणी नक्षत्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP