Dictionaries | References

चौपदरी

   
Script: Devanagari

चौपदरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
caupadarī a Four-folded. 2 Of four strands, yarns, or single strings--a rope. चौ0 गळा काढणें To bawl or bellow loudly.
caupadarī f A four-folded alms-bag; a beggar's wallet. चौ0 घेणें To take up the begging trade.

चौपदरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Four-folded.
 f  A four-folded alms-bag.

चौपदरी     

ना.  उलटी अंबारी , भिकेची झोळी , भिक्षापात्र ;
ना.  झोळी , पडशी , पिशवी , पोतडी , बटवा , शबनम ;
ना.  कंठाळ , गोण , गोणी , पोते , बारधान , बुधला .

चौपदरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  चार पदर वा पेड असलेले   Ex. त्यांनी फुलांचा एक चौपदरी गोफ विणला.

चौपदरी     

 स्त्री. चौकोनी फडक्याचीं चार टोकें एकत्र धरून भिक्षेसाठीं बनविलेली झोळी ; मधुकरीचें फडकें ; भिकार्‍याची झोळी . अन्नत्रवाल्यास जसा चौपदरीचा योग यावा त्याप्रमाणें या भरतभूमिवासी जडभरताची आजला हालहवाल होऊन गेली आहे . - केसरी - वि . १ चार पदरांचा , पेडांचा ( दोर इ० ). २ चौघडी ; चार पदर होतील अशा रीतीनें घडी घातलेलें ( लुगडें , धोतर इ० ). [ चौ = चार + पदर = कोपरा , टोंक ] ( वाप्र . )
०गळा   मोठयानें रडणें , ओरडणें .
काढणें   मोठयानें रडणें , ओरडणें .
०हातीं   , हातीं येणें - भिक्षा मागण्याचा धंदा आरंभिणें ; भीक मागणें . अलीकडे तूं मुळींच अभ्यास करीत नाहींस , पुढें चौपदरी हातीं घेणार आहेस कीं काय ?
घेणें   , हातीं येणें - भिक्षा मागण्याचा धंदा आरंभिणें ; भीक मागणें . अलीकडे तूं मुळींच अभ्यास करीत नाहींस , पुढें चौपदरी हातीं घेणार आहेस कीं काय ?
०चा  पु. ( उप . ) भिकारी . चौपदरीचा जहागिरदार , नी मिजास बादशहाची .
जहागिरदार  पु. ( उप . ) भिकारी . चौपदरीचा जहागिरदार , नी मिजास बादशहाची .

चौपदरी     

चौपदरी गळा काढणें
मोठ्यानें रडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP